आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर आरक्षणाबाबत आतापासूनच उत्सुकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. मात्र, महापौर आरक्षणाबाबत मात्र आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिल्या जाणार असल्याने महापौर पदाचे आरक्षण फ्रेश निघणार की, आतापर्यंत झालेले आरक्षण वगळून होणार? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

दहावीच्या परिक्षा मार्च महिन्याच्या प्रारंभीच सुरू होत असल्याने फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची िनवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापौर आरक्षणाची सोडत केव्हा? अशी चर्चा सुरु झाली आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षाची सोडत जाहीर झाल्याने महापौरांच्या आरक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. काहींच्या मते महापौर आरक्षणाची सोडत पुढील महिन्यात होईल. परंतु, पुढील महिन्यात पाच डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु होत असून, हे अधिवेशन १७ डिसेंबरपर्यंत चालेल. त्यामुळेच हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतरच महापौर आरक्षणाची सोडत होऊ शकते. एकीकडे महापौर पदाच्या आरक्षणाबाबत चर्चा सुरू असताना महापौर पदाच्या आरक्षण फ्रेश होणार की आतापर्यंत झालेले आरक्षण सोडून होणार? याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

२००१ ला महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २००२ ला महापौरपद महिला ओबीसीसाठी निघाले होते, तर उर्वरित अडीच वर्षांसाठी खुला प्रवर्गासाठी पद आरक्षित होते. या निवडणुका एका प्रभागातून चार या नुसार घेण्यात आल्या. त्यानंतर २००७ ला महापालिका निवडणुकीत वॉर्ड पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यामुळे महापौर पदाचे आरक्षण फ्रेश काढण्यात आले.
त्यावेळी ओबीसी पुरुष तर २०१२ च्या निवडणुकीत पुन्हा प्रभाग पद्धतीचा वापर झाला. यावेळी अनुसूचित जाती महिलांसाठी महापौर पद आरक्षित होते. त्यामुळे अद्याप अनुसूचित जाती पुरुष, अनुसूचित जमाती महिला पुरुष या प्रवर्गाचे आरक्षण अद्याप निघालेले नाही. त्यामुळेच ज्या प्रवर्गाचे आरक्षण अद्याप जाहिर झालेले नाही, त्या प्रवर्गापैकीच आरक्षणाची सोडत निघणार की पुन्हा नव्याने आरक्षण काढले जाणार? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

तर्क-वितर्क
महापालिकेच्या निवडणूकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिल्या जाणार अाहेत. त्यामुळे नगरसेवक निवडून दिल्या जाणार असल्याने महापौर पदाचे आरक्षण फ्रेश निघणार की, आतापर्यंत झालेले आरक्षण वगळून होणार? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...