आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यावधी निवडणुकीसाठी जिल्हा भाजप सत्कारात्मक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - मध्यावधी निवडणुकासांठी जिल्हयातील भाजप नेते सत्कारात्मक असल्याचा अहवाल प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे प्रदेश कार्यकारीणीरीच्या माध्यमातून शुक्रवारी सादर केला. पक्ष वाढीसाठी बुथ प्रमुख नेमणुकीसह इतरही मािहती सादर करण्यात अाली अाहे. 
 
शिवसेना केंद्र, राज्य सरकारला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडत नाही. काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने बाळापूर येथे रुमणे अांदाेलन केले हाेते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अकाेल्यात विदर्भातील शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ केला हाेता. तूरखरेदीवरुन जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालय कृिष उत्पन्न बाजार समितीमध्ये हल्लाबाेल अांदाेलन केले हाेते. काही दिवसांपूर्वी तर शिवसेनेने भाजपने कर्जमुक्तीवरुन लावलेले फलकच फाडले हाेते. परिणामी जिल्ह्यातील शिवसेनेकडून हाेणाऱ्या कुरघाेडीला भाजप कंटाळला अाहे. महापालिकेत एक हाती सत्तास्थापन केलेल्या भाजपला मालमत्ता करवाढीवरुन सेना लक्ष करीत अाहे. त्यामुळे भाजपने जिल्हयात तर अाता ठामपणे एकला चलाे रेची भूमिका घेतली अाहे. मध्यावती निवडणुकीच्या दृष्टीकाेनातून भाजपने मािहती संकलित केली अाहे. 

दरम्यान, भाजपअध्यक्ष अमित शाह यांच्या महाराष्ट्र दाैऱ्याला शुक्रवारी प्रारंभ झाला. मुबंई शाह यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी जिल्हातील प्रमुख पदाधिकारी लाेकप्रतििनधी उपस्थित हाेते. तत्पूर्वी यांना जिल्ह्याची मािहती सादर करण्यात अाली. 
 

बुथप्रमुखांसह इतरही माहिती : पक्षाध्यक्ष अमित शाह यांना प्रदेशस्तरावरुन दिलेल्या मािहतीमध्ये बुधप्रमुखांसह जिल्हयातील विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती सादर करण्यात अाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. एकूण हजार २२८ बुथची मािहती, बुथमध्ये नियुक्त केलेले १२ हजार २८० कार्यकर्ते, विस्तारांची मािहती सादर करण्यात अाली. सहा महिन्यांसाठी विस्तारक ग्रामीण भागासाठी अाणि दाेन विस्तारकांची महानगरात नियुक्ती करण्यात अाली अाहे. हे विस्तार सहा महिने त्या भागाचा दाैरा करणार असून, ते या कालावधीत स्वत:च्या घरीही जाणार नाहीत. 

सहयाेग निधीचे संकलन : जिल्हयातएकूण १४ लाख रुपयांच्या सहयाेग निधीचे संकलन करण्यात येणार असल्याचे समजते. हा निधी पक्ष कार्यासाठी वापरण्यात येणार अाहे. तसेच ज्येष्ठ विस्तारांवर भाजपपासून दुरावलेल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांंना पक्षात पुन्हा सक्रिय करता येईल काय, याची जबाबदारी देण्यात अाली अाहे. महापालिका निवडणुकीत अनेकांनी बंडखाेरी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात अाले हाेते. अाता या बंडखाेरांशी चर्चा हाेणार कि नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट हाेणार अाहे. 

नेते अायात हाेणार ? 
सूत्रांनीिदलेल्या माहितीनुसार भाजपमध्ये जिल्हयातील इतर राजकीय पक्षांतून प्रवेश करु इच्छिणाऱ्या नेत्यांची संख्या ५० च्या घरात अाहे. यामध्ये भारिप-बमंस, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेना नेत्यांचा समावेश अाहे. या नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यास काेणता फायदा किंवा ताेटा हाेऊ शकताे, याचीही चाचपणी करण्यात अाल्याचे समजते. 

शिवसेनेचा‘बाण’ राेखण्याचे अाव्हान : सध्यालाेकसभा अाणि जिल्ह्यातीतील अकाेला पूर्व, पश्चिम, मूर्तिजापूर अाकाेट विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात अाहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केल्यास महापलिका, मूर्तिजापूर, अाकाेट तेल्हारा नगर पािलकांवर भाजपचा झेंडा अाहे. त्यामुळे भाजपच्या तुलनेने शिवसेनेला राजकीय वर्चस्वासाठी प्रचंड परिश्रम करावे लागणार हे जरी खरे असले तरी काही महिन्यांपासून शिवसेना अाक्रमकपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरली अाहे. तसेच शिवसेनेने शेतीशी निगडीत प्रश्नांवरुन प्रश्नावली तयार केली असून, या प्रश्नांची उत्तरे थेट शेतकऱ्यांकडून घेण्यात येत अाहे. त्यामुळे मध्यावती निवडणुका झाल्यास शिवसेनेच्या बाणची गती राेखण्याचे अाव्हान भाजपकडे उभे ठाकणार अाहे. 

माहिती सादर केली 
^जिल्हयातील पक्षकार्याचा तपशील प्रदेशस्तरावरुन सादर करण्यात अाला अाहे. मध्यावतीसाठी स्थानिक नेते, लाेकप्रतिनिधी, कार्यकर्ते तयार अाहेत. निवडणूक लढून जिंकण्यासाठी पक्ष सक्षम अाहे. किशाेर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष, भाजप 
बातम्या आणखी आहेत...