आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 व‍ीतल्या \'आर्ची\'ने 10 वीतल्या \'परश्या\'ला पळवले, \'सैराट\' प्रेमीयुगुल 12 तासांत सापडले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धाड - कानातदुखत असल्याने औषधी आणायला जाते, असे सांगून घरातून निघून गेलेली इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी एका दहावीच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली. ही घटना 7 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी 8 एप्रिल रोजी पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेवून अवघ्या बारा तासातच या प्रेमी युगलाला आज 9 एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे. 
 
सध्या जगातील मोबाईल कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञानात उत्तुग अशी भरारी घेत अवघे जग मुलांपासून वयस्कर नागरिकांच्या बोटाच्या एका क्लिकवर आणून सोडले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागसुद्धा मागे राहिला नाही. परंतु या साधनाचा वापर आणि त्याचे वाईट परिणाम हे ग्रामीण भागात घडणाऱ्या घटनामुळे समोर येत आहे. दोन दिवसापूर्वी इजलापूर येथील एक शाळकरी मुलगी कानात दुखत असल्याने औषधी आणायला जाते, असे सांगून घरून निघाली. परंतु संध्याकाळ होवूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी काल 8 एप्रिल
रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. 
 
पोलिसांनी मुलीचे वर्णन इतर माहिती घेवून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. परंतु पोलिसांनी चौकशी केली असता वेगळेच प्रकरण समोर आले आहे. इजलापूर येथील अल्पवयीन मुलगी मढ येथील चक्रधर स्वामी विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत आहे. तर त्याच शाळेत इयत्ता दहावी मध्ये सिल्लोड येथील रोहित संतोष दुबे हा शिक्षण घेत आहे. तो शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे राहात आहे. एकाच शाळेत असल्याने त्यांचे सुत जुळले. 

त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत 7 एप्रिल रोजी लग्न करण्याच्या उद्देशाने गावातून पलायन केले. ही बाब लक्षात येताच ठाणेदार सुनिल जाधव यांनी पीएसआय शेवाळे, पोहेकॉ आेमप्रकाश साळवे, बळीराम खंडागळे माधव कुटे यांचे पथक तयार करून या प्रेमी युगलाच्या शोधार्थ पाठविले. गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने अवघ्या बारा तासात सैराट प्रेमी युगुलाला सिल्लोड येथून ताब्यात घेतले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...