आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात नव्या ३९ खाणींना प्रशासनाकडून हिरवा कंदील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - माती,मुरुम, खडक अशा गौण खनिजांचा आढळ असलेल्या ३९ नव्या ठिकाणी खोदकाम करण्याची परवानगी महसूल खात्याने दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील खाणींच्या एकूण संख्येत ३९ ची भर पडली आहे. नव्या खाणींतून निघणारी गौण खनिजे ही शासकीय इमारती, राज्य महामार्ग, इतर रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी वापरली जाणार आहेत. 
 
अकोल्यातून जाणाऱ्या नागपूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण आणि इतर बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजांची गरज होती. ती भागविण्यासाठी नव्या खाणींचा शोध घेण्याचे महसूल प्रशासनाचे प्रयत्नही सुरुच होते. दरम्यानच्या काळात खनिकर्म विभाग, महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संयुक्त पथकाने पाहणी करुन ही नवी ठिकाणे शोधून काढली. 

गौण खनिजांचा आढळ असलेल्या नव्या ठिकाणांची प्रारंभी जिल्हाधिकारी स्तरावर कसून पडताळणी केली गेली. ती झाल्यानंतर सर्व ३९ ठिकाणे जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवण्यात आली. प्रवासाचे हे एक चक्र पूर्ण झाल्यानंतर अंतीम मान्यतेसाठी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला गेला. त्यांनी अलीकडेच या सर्व नव्या खाणींना हिरवा कंदील दाखवला आहे. विभागीय आयुक्तांच्या या मान्यतेमुळे जिल्ह्यातील सर्व ३९ ठिकाणे उत्खननासाठी पात्र ठरली असून विधीवत प्रक्रियेनंतर
त्याठिकाणाहून माती, मुरुम, दगड काढले जाणार आहेत. 

या नव्या ठिकाणांमध्ये जिल्हा मुख्यालय असलेल्या अकोला तालुक्यातील १६, बाळापूर बार्शिटाकळी तालुक्यातील प्रत्येकी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी तिन्ही प्रकारच्या गौण खनिजांचा आढळ आहे. विशेष असे की यातील तब्बल ३० ठिकाणे सरकारी जागेत असून एक जागा भर आकारी पडजमीनीवर आहे. परंतु त्याची मालकीही शासकीयच आहे. यामुळे महसूल खात्याच्या उत्पन्नात आणखी भर पडणार आहे. 

उत्पन्नात वाढ होणार 
जिल्ह्यात नव्याने ३९ ठिकाणी खाणी तयार होत असल्याने महसूल खात्याच्या तिजोरीतही मोठी भर पडणार आहे. माती, मुरुम आणि खडकासह वाळूच्या घाटापासून तसेच खाणीच्या लिलावामुळे दरवर्षी खनिकर्म विभागाला कोट्यवधीचे उत्पन्न मिळत आहे. त्यात या नव्या खाणीतून निघणाऱ्या गौण खनिजाच्या रॉयल्टीची भर पडणार आहे. 

आठ ठिकाणी खासगी मालकी 
३९ पैकी आठ ठिकाणे ही खासगी मालमत्ता आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून केल्या जाणाऱ्या उत्खननापोटी संबंधित जमीन मालकाला मोबदला दिला जाणार आहे. ही आठही ठिकाणे बार्शिटाकळी तालुक्यातील असून त्यासाठी अभिजीत लहाने, शशीमोहन तापडिया, सतीश बलोदे, गणेश बलोदे, लखन गावंडे, चंद्रशेखर देशमुख प्रदीप देशमुख यांच्याशी करार केला जात आहे. 

या ठिकाणी आहेत नव्या खाणी 
अकोला तालुका : चिखलगाव,ताकोडा, बोरगाव मंजू, मोरगाव भाकरे, खडकी टाकळी, माझोड, निपाणा, मासा, कोळंबी, दाळंबी, अन्वी, येवता, मोरगाव (सा), दधम कान्हेरी. 

मूर्तिजापूरतालुका : हेंडज,नागठाणा, भगोरा, खरब नवले, शेलू वेताळ, मधापुरी कुरुम. 
बार्शिटाकळी तालुका : विझोरा,सराव, ब्राह्मणदरी पिंपळखुटा. 

निपाणा येथे उत्खनन सुरू 
^नव्याने मंजूर झालेल्या ३९ खाणींपैकी सध्या निपाणा (ता. अकोला) येथे उत्खनन सुरु झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेले गौण खनिज त्याठिकाणी आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या (मुंबई येथील बीसीसी कंपनी)मागणीनुसार त्यांना परवानगी देण्यात आली आहे.’’ डॉ.अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला. 
बातम्या आणखी आहेत...