आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोताळा तहसील कार्यालयामध्ये काँग्रेसच्या वतीने बैठा सत्याग्रह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोताळा येथे बैठा सत्याग्रह करताना काँग्रेस पदाधिकारी शेतकरी. - Divya Marathi
मोताळा येथे बैठा सत्याग्रह करताना काँग्रेस पदाधिकारी शेतकरी.
मोताळा- शासनाने खरेदी केलेली तुर बारदान्याअभावी गोडाऊनमध्ये पडुन असुन ती तुर उचलण्यासाठी तातडीने बारदाना उपलब्ध व्हावा या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यासमवेत तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह आज १२ एप्रिल रोजी करण्यात आला. यावेळी बारदाना उपलब्ध होताच तातडीने तुर उचलण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिले. 
 
तालुक्यामध्ये नाफेडमार्फत जय सरदार कृषी विकास कंपनी यांनी भोरटेक येथे संत गजानन शेतकरी उत्पादक कंपनीने थड येथे, नळगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने वाघजाळ येथे, फामर्स प्रोड्युसर कंपनीने पिंपळगाव देवी येथे नाफेड लघु कृषक व्यापार संघामार्फत हमी भावाने तुर खरेदी सुरु केली होती. यासर्व केंद्रावर हजार ५० रुपये या भावाने २१ हजार ४२५ क्विंटल तुर खरेदी करण्यात आली. परंतु बारदाना नसल्यामुळे अनेक ठिकाणी तुर तशीच पडुन आहे. संत गजानन शेतकरी उत्पादक कंपनी येथे तर जवळपास ३५०० क्विंटल तुर बारदान्याअभावी पडून आहे. २२ फेब्रुवारी पासून सर्वच केंद्राची खरेदी बंद आहे. बारदान्याअभावी पडुन असलेल्या तुरीसाठी तातडीने बारदाना उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह करुन भावना तहसीलदारामार्फत शासनाला कळविल्या. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल खाकरे, एकनाथ खर्चे, गणेश राजपूत, महेंद्र गवई, उखा चव्हाण, अविनाश पाटील, विजयसिंग राजपूत, गणेश पाटील, नाना देशमुख, हमीद कुरेशी, चेतन पानसर, संजय किनगे, बाळु पाटील, गणेश बस्सी, छोटु पाटील, सुभाष पाटील, नितूसिंग राजपूत, अशोक पाटील, अ. हसन, सोनु कुडे, यशवंत फेंगडे, सुनील चोपडे शेतकरी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...