आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमपीएससी’ करणाऱ्या विद्यार्थ्याची अात्महत्या, परिस्थितीमुळे मोहन गेला होता खचून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-  बी.कॉमचे शिक्षण झाल्यानंतर एमपीएसीचे क्लासेस करायचे आणि अधिकारी होऊन गरिबीवर मात करायची, असे स्वप्न उराशी बाळगून संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथील विद्यार्थी अकोल्यात शिक्षणासाठी आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिस्थितीशी दोन हात करण्यात तो कमी पडला आणि त्याने मृत्यूला जवळ करीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 
 
मोहन वासुदेव धनोकार (वय २२ रा. निवाणा ता. संग्रामपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने बीकॉम पूर्ण केल्यानंतर अकोल्यात एमपीएससीचे क्लासेस लावले होते. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे आईवडिल आणि भाऊ मोलमजुरीचे काम करतात. अशाही परिस्थितीत त्याला ते तुटपुंजे का होईना पण मदत करीत आहेत. मोहन त्याच्या गावातीलच त्याचा मित्र सागर सुभाष उंबरकार हे दोघे बुलडाणा जिल्ह्यातीलच दोघांसोबत जठारपेठेतील नयन अपार्टमेंटमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. बुधवारी रात्री चारही मित्रांनी जेवण केल्यानंतर अभ्यास केला. तर मोहन हा एकटाच दुसऱ्या रुममध्ये अभ्यासाला बसला होता. तिघे मित्र झोपल्यानंतर मोहनने गळफास घेतला. सकाळी तिघेही उठले मात्र मोहन उठल्यामुळे त्यांनी दाराच्या फटीतून बघितले असता त्यांना मोहन हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी पोलिसांना कळवले. सिव्हिल लाइन्स पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मोहनचा मृतदेह शवविच्छनासाठी रवाना केला. 
 
भावाने दाखवले हातावरचे फोड 
घटनेची माहिती मिळताच मोहनचे नातेवाईक सकाळीच अकोल्याला आले. यावेळी त्याचा मोठा भावाने मोहनला पाहतवाच हबरंडा फोडला. मोहनने असे नको करायला पाहिजे होते, त्यासाठी आपण कितीही कष्ट केले असते, असे म्हणून त्याने तळहातावरील फोड पोलिसांना दाखवले. तर तिकडे वडिलांना त्याच्या मृत्यूची बातमी लागताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करावे लागले. 

माझ्या मृत्यूसाठी मीच जबाबदार 
माेहनने मृत्यू-पूर्व डायरीत लिहून ठेवले, की स्वत: माझ्या मर्जीने आत्महत्या करीत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही. ही डायरी त्याच्या पायाजवळ लिहलेली होती. या डायरीवर जानेवारीचा उल्लेख असल्यामुळे रात्री १२ नंतर त्याने गळफास घेतल्याचे समजते. 
 
बातम्या आणखी आहेत...