आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात पराभूत उमेदवार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी, मतदान मतमोजणीत घाेटाळा झाल्याचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदान मतमोजणीत घाेटाळा झाल्याचा अाराेप करीत शुक्रवारी पराभूत उमेदवार अणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना निवेदन देत पुढील निवडीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. यासाठी एव्हीएमविराेधी संघर्ष समिती स्थापन करण्यात अाली असून, समितीने न्यायालयीन लढ्याचा निर्धार केला अाहे. 
 
खदान परिसरातील शासकीय गोदामात झोन निहाय मतमोजणी करण्यात अाली. भाजपने ८० पैकी ४८ जागा काबिज केल्याने विराेधक गारद झाले. दरम्यान, शुक्रवारी इव्हीएम (इलेक्ट्राॅिनक व्हाेटींग मशिन) घाेळ झाल्याचा अाराेप पराभूत उमेदवार अणि काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, भारिप-बमंस, मनसे, शिवसेनेच्या नेत्यांनी अशाेक वाटिकेत धाव घेतली. सर्वांनी इव्हीएममध्ये कसा घाेळ करण्यात अाला, याचा पाढाच वाचला. त्यानंतर सर्वांनी थेट जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांना निवेदन दिले. 

असा झाला संवाद 
जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन देण्यासाठी संघर्ष समितीतर्फे काॅंग्रेस महानगराध्यक्ष रफिक िसद्धीकी, मदन भरगड, राकाॅंचे महानगराध्यक्ष अजय तापडीया, भारिप-बमसंचचे नेते बालमुकुंद िभरड, मनसेचे पंकज साबळे, अानंद बलाेदे, शिवसेनेचे सागर भारुका, स्वाती देशमुख, अविनाश देशमुख, पुष्पा गुलवाडे, जयश्री भुईभार अादींनी निवेदन दिले. इव्हीएममध्ये घाेळ करुन विशिष्ट पक्षाच्या उमेदवारालाच मतदान हाेत हाेते, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले. एखाद्या बुथवर संबंधित उमेदवाराचे कुटुंबीय असलेल्या बुथवर त्याला एकच मत मिळाले. ते सर्वजण शपथ पत्र देण्यासही तयार अाहेत, असेही सदस्यांनी सांगितले. यावर काेणी काेणाला मतदान केले हे काेणीच त्याला विचारु शकत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काँग्रेसचे नेते प्रल्हाद ढाेरे यांनीही एका बुथ परिसरात माेठ्या प्रमाणात कुटुंबीय, समर्थक राहत असतानाही संबंधित उमेदवाराला केवळ २१ मते मिळाल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही हे सिद्ध करु शकता काय, असा सवाल केला. त्यावर ढाेरे यांनी नाही म्हटले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन वरिष्ठांना पाठवण्यात येईल, असे अाश्वासन दिले. यावेळी रफिक सिद्दीकी, पंकज जायले, नितीन ताकवाले, पवन महल्ले, प्रशांत भटकर, महादेवराव शिरसाट, बाळासाहेब इंगाेले, महादेवराव घाेसे, मनाेहर पंजवाणी, निशिकांत बडगे, राहुल इंगाेले, विजया पाटील यांच्यासह पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच तहसीलदार राजेश्वर हांडे, उपविभागीय पाेलिस अधिकारी उमेश माने, जिल्हा विशेष शाखेचे प्रमुख, डी. सी. खंडेराव, सिटी काेतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, सिव्हिल लाईन्सचे ठाणेदार शेख आणि पाेलिस कर्मचारी हजर हाेते. 
 
अाज बैठक 
इव्हीएमिवराेधी संघर्ष समितीने इव्हीएम घाेटाळ्याप्रकरणी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्धार केला असून, यासाठी शनिवारी दुपारी वाजता शिवाजी पार्क येथे बैठक अायाेजित करण्याचा निर्णय अशाेक वाटिकेतील छाेट्याखानी सभेत घेण्यात अाला. काहींनी अकाेला बंदची हाक देण्याची मागणीही केली. मात्र अनेकांनी अाधी न्यायालयीन लढ्याची तयारी करण्याचा प्रस्ताव पुढे केला.
 
 काय अाहे निवेदनात? 
इव्हीएम विराेधी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढील बाबींचा उहापोह केला अाहे. 
१.महापालिका निवडणुकीचा निकाल मान्य नसून, महापौर पदाची निवड प्रक्रिया रद्द करा अणि सर्व मशिन सॉफ्टवेअर सांभाळून ठेवा. 
२. फेरमतमाेजणीत निर्णय, अाकडे बदलल्याचे दिसून अाले. वास्तविक हेच अाकडे यापूर्वीही दिसणे अपेक्षित हाेते. 
३. एका उमेदवाराला बुध क्रमांक १९ २० मध्ये त्यांचे कुटुंबीय असलेल्या मतदारांची संख्या १०० अाहे. मात्र या उमेदवाराला केवळ २० मते मिळाली. हे सर्व कुटुंबीय अाम्ही त्यांनाच मते दिली, असे लिहून देण्यास तयार अाहेत. 
४. भाजपला बुध प्रतिनिधीही मिळालेल्या ठिकाणी त्यांचे उमेदवार विजयी कसे झाले? 
 
समितीने वाचला यंत्रणेच्या बेताल काराभाराचा पाढा 
इव्हीएम विराेधी संघर्ष समितीने जिल्हािधकाऱ्यांपुढे निवडणूक यंत्रणेच्या बेताल काराभाराचा पाढाच वाचला. मशिनवर अधिकारी लांबून उमेदवारांच्या प्रतिनिधींना किती मते मिळाली, हे दाखवत हाेते. मात्र मतांची नाेंद करण्यापूर्वीच अधिकारी पुढील प्रक्रिया सुरु करीत हाेते. अनेक ठिकाणी मतमाेजणी उमेदवारांंच्या प्रतिनिधीच्या गैरहजेरीतच झाली. मतमोजणीच्या ठिकाणाहून प्रतिनिधींना हाकलून देण्यात अाले, असा अाराेपही समितीच्या सदस्यांनी केला. 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी अापण मतमाेजणीच्या ठिकाणी अडीच ते तीन तास हाेताे, असे सांगत, तेथेच तक्रार का केली नाही, असा सवाल केला. त्यावर पुर्नमतमाेजणीची मागणी करणार अर्ज स्वीकारण्यास प्रथम अधिकाऱ्यांनी नकार दिला असे सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अर्जाचा पाेच देण्यात अाली.मात्र नंतर अर्ज नामंजूरही करण्यात अाला, असेही यावेळी उपस्थित सदस्यांनी बोलून दाखवले.
 
उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर केल्यानंतर शिवणीसह इतरही प्रभागातील काहींना पराभूत झाल्याचे समजले, असे सदस्यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया कशी असते, हे सांगितले. उमेदवाराला मिळालेली मते निवडणूक अायाेगाला पाठवण्यात अाली. अायाेगाने या माहितीची खातरजमा केल्यानंतर निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली. त्यानंतरच निकाल जाहीर करण्यात अाला, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी निवासस्थानी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...