आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता, उमेदवारांचा विजय; पाठीराख्यांचा जल्लोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायंकाळपर्यंत लोक थांबून होते. - Divya Marathi
सायंकाळपर्यंत लोक थांबून होते.
महापालिकेच्या उत्सुकता शिगेला पोचलेल्या मतमोजणीत भाजपने धुव्वाधार बॅटींग करत महापालिकेत एक हाती सत्ता काबीज केली. ८० पैकी तब्बल ४८ जागी भाजपचे उमेदवार निवडुन आले. विरोधकांमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसने घेऊन विरोधी पक्षनेत्यावर आपला हक्क सांगीतला आहे. 
अकोला - खदान भागातील शासकीय गोदामामध्ये महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. शुक्रवारी सकाळपासूनच उत्कंठा वाढत होती. गोदामाच्या बाहेर महानगराच्या विविध भागातून आलेले हजारो लोक निकाल ऐकण्यासाठी आले होते. आपल्या प्रभागातील उमेदवार विजयी घोषित झाला की फटाक्यांची आतिषबाजी, मंगलवाद्यांचा गजर करण्यात येत होता. या भागाला सकाळपासूनच यात्रेचे स्वरूप आले होते. काही वेळानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. तरीही जल्लोष कमी होत नव्हता. आनंद आणि विरस असा अनुभव देखील उमेदवारांच्या समर्थकांना घ्यावा लागला. विजयी झालेल्या उमेदवारासाठी फटाके फुटायचे आणि नंतर पराभूत उमेदवाराने फेरमोजणीची मागणी केल्यानंतर निकाल बदलले जाण्याचा अनुभव आला. त्यामुळे बऱ्याच जणांचा हिरमोड झाला. फेरमतमोजणी झाल्याने निकालाची प्रक्रिया लांबली.
 
पक्षाचेध्वज ताब्यात घेतले : मतमोजणीच्यादरम्यानही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातून पक्षाचे ध्वज ताब्यात घेतले. या ठिकाणी गडबड होणार नाही, याची दक्षता सुरक्षा दलाकडून घेण्यात येत होती. परंतु त्यामुळे विचलित होता कार्यकर्ते जल्लोष करत होते. 

पोलिसांनी जमावाला रेटले : मोठाजमाव गोळा झाल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटले. विशिष्ट अंतर ठेवण्याची वारंवार सूचना करुनही जमाव ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांनी त्यांना मागे रेटले. 
 
अकोला - खदानभागातील शासकीय गोदामामध्ये महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. शुक्रवारी सकाळपासूनच उत्कंठा वाढत होती. गोदामाच्या बाहेर महानगराच्या विविध भागातून आलेले हजारो लोक निकाल ऐकण्यासाठी आले होते. आपल्या प्रभागातील उमेदवार विजयी घोषित झाला की फटाक्यांची आतिषबाजी, मंगलवाद्यांचा गजर करण्यात येत होता. या भागाला सकाळपासूनच यात्रेचे स्वरूप आले होते. काही वेळानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. तरीही जल्लोष कमी होत नव्हता. आनंद आणि विरस असा अनुभव देखील उमेदवारांच्या समर्थकांना घ्यावा लागला. विजयी झालेल्या उमेदवारासाठी फटाके फुटायचे आणि नंतर पराभूत उमेदवाराने फेरमोजणीची मागणी केल्यानंतर निकाल बदलले जाण्याचा अनुभव आला. त्यामुळे बऱ्याच जणांचा हिरमोड झाला. फेरमतमोजणी झाल्याने निकालाची प्रक्रिया लांबली. सायंकाळपर्यंत लोक थांबून होते. 
 
पक्षाचेध्वज ताब्यात घेतले : मतमोजणीच्यादरम्यानही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातून पक्षाचे ध्वज ताब्यात घेतले. या ठिकाणी गडबड होणार नाही, याची दक्षता सुरक्षा दलाकडून घेण्यात येत होती. परंतु त्यामुळे विचलित होता कार्यकर्ते जल्लोष करत होते. 

पोलिसांनी जमावाला रेटले : मोठाजमाव गोळा झाल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटले. विशिष्ट अंतर ठेवण्याची वारंवार सूचना करुनही जमाव ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांनी त्यांना मागे रेटले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...