आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: मनपा निवडणूक, 579 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला; आज मतमोजणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांबद्दल मतदारांनी निश्चित केलेले गुण २३ फेब्रुवारीला जाहीर होत आहेत. त्यामुळे आज गुणपत्रिका तपासल्या जाणार असून, ५७९ उमेदवारांपैकी ८० उमेदवार सभागृहात पोहोचणार आहेत. मंगरुळपीर मार्गावरील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होत आहे. निवडणूक विभागाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून, निकालाकडे अकोला वासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतुने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
 
गेल्या १२ ते १५ दिवसांपासून निवडणुकीची धामधुम सुरू होती. रविवारी निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या, तर २१ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने मतदारांच्या संख्येत वाढ होऊनही त्या तुलनेने मतदानाची टक्केवारी मात्र वाढली नाही. टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृतीही केली. मात्र, नवीन प्रभाग रचनेमुळे बदललेले मतदान केंद्र, वोटर स्लिप मतदारांपर्यंत पोहोचणे मतदान यादीत नाव मिळणे त्याच बरोबर मतदारांचा निरुत्साह या प्रकारामुळे मतदानाची टक्केवारी वाढली नाही. परिणामी ५६ टक्के मतदान झाले. मतदारांनी दिलेल्या कौलाचा निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर होत आहे. झोननिहाय मतमोजणी होणार आहे. पाच झोन, प्रत्येक झोनमध्ये चार प्रभागांचा समावेश आहे. एका झोनमधील मतमोजणीसाठी १४ टेबल लागणार आहेत. मतमोजणीसाठी ३० कर्मचारी तसेच आठ शिपाई नियुक्त केले आहेत. त्यामुळे पाच झोनसाठी एकूण १९० कर्मचारी नियुक्त केले आहेत. याच बरोबर काही राखीव कर्मचारीही नियुक्त केले आहेत. सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होत असून, दुपारी ते पर्यंत २० प्रभागाचे म्हणजेच ८० जागांचे निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली अाहे. स्थानिक केबल नेटवर्कवर मतमोजणीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळेच या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बहुमताचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे शक्य नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले असून, सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाचा टेकू घ्यावाच लागणार आहे. 
 
महापालिका निवडणुकीची मतमाेजणी गुरुवारी शासकीय धान्य गाेदाम परिसरात हाेणार असून, येथेच इव्हीएम ठेवली अाहेत. या पार्श्वभूमिवर गाेदाम परिसरात तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला. 

महापालिकेत तूर्तास काँग्रेस १८, भाजप १८, शिवसेना - ८, भारिप-बमसं - ७, राष्ट्रवादी काँग्रेस , अपक्ष ११, युडीएफ २, मनसे - १, सपा - १, अकोला विकास आघाडी - असे पक्षीय बलाबल आहे. पाच वर्षांच्या कालावधीत पहिल्या अडीच वर्षात भारिप-बमसं, काँग्रेस, राष्ट्रवादी अपक्ष यांनी सत्ता घेतली, तर उर्वरित अडीच वर्षात भाजप-सेना अपक्ष यांची सत्ता होती. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत उतरलेल्या सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. त्यामुळे मतदार आपली पसंती कोणत्या पक्षाला देतात? याबाबत उत्सुकता लागली असून, विद्यमान पक्षीय बलाबलात कोण-कोणत्या पक्षात वाढ होती की घट होते? ही बाब आज स्पष्ट होईल. 
बातम्या आणखी आहेत...