आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाने केला भावाचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाेरगावमंजू - अापातापा येथे पाठच्या भावानेच गळा अावळून भावाचा खून केल्याचा अाराेपाची फिर्याद २८ अाॅक्टाेंबर राेजी बाेरगाव पाेलिसात दिल्यावरून पाेलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.
बाेरगाव पाेलिसात दिपाली विक्रांत घाेडे या महिलेने तक्रार दिली की, माझ्या पतीला दीर कैलास घाेडे याने अाॅक्टाेबरला माेबाईलवर फाेन केला. अापल्या शेतात फवारणी करायची अाहे, मी येताे, तू पण शेतात चल असे सांगितले. परंतू किरकाेळ कारणांवरून दाेन भाऊ एकमेकांशी बाेलत नव्हते. अचानक भावाचा फाेन अाल्यामुळे माझ्या नवऱ्याला अानंद झाला हाेता. कैलास शेतात फवारणीसाठी येत असल्यामुळे मी शेतात जाताे, असे सांगून माझे पती सकाळी शेतात गेले. परंतू संध्याकाळी ते शेतात परतले नाही. त्यामुळे सर्वत्र चाैकशी केली. तर दीर कैलास याने विक्रांत यास चक्कर येत असल्यामुळे सर्वेापचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती दिली. दुसऱ्या दिवशी अाॅक्टाेबर विक्रांत यांचा मृतदेह घरी अाला, अशी फिर्याद दीपाली घाेडे यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून कैलास देवनाथ घाेडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पाेलिस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी.के.काटकर, पीएसअाय अशाेक पितळे, हेड काॅन्टेबल अरूण गावंडे, विलास बन्क्वार, संत्येंद्र पपचवाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. अाराेपीस ताब्यात घेण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...