आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून फेकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात बांधून डंपींग ग्राऊंडमध्ये फेकला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. 
 
नायगाव येथील संजय नगरातील रहिवासी शेख फिरोज शेख रशीद यांची पाच वर्षीय चिमुकली आलीया परवीन शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. बराचवेळ झाल्यावरही ती घरी परत आल्याने तिच्या आईने शेख फिरोज यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. त्यानंतर आई-वडीलांनी शेजारी तसेच नातेवाईकांकडे आलीयाचा शोध सुरु केला. मात्र, रात्री उशीरापर्यंत तिचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी मशीदीवरील ध्वनीक्षेपकाव्दारे आलीया बेपत्ता झाल्याचे जाहीर केले तसेच ती कुठेही आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. मात्र त्यानंतर २४ तासांचा कालवधी उलटल्यावरही आलीयाचा शोध लागल्याने तिच्या आई-वडीलांनी आकोट फैल पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. आकोट फैल पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली. त्यानंतर पोलिसांनी जिल्हयातील पोलिसांनाही वायरलेसवरून मॅसेज दिला. मात्र, आलीयाचा पत्ता लागला नाही. रविवारी दुपारी आलीयाचा एक भाऊ या डंपिंग ग्राऊंड परिसरात गेला असता आलीयाचा मृतदेह कचऱ्यातील घाण पाण्यात एका पोत्यामध्ये नग्नावस्थेत कुजलेला असल्याचे दिसून आला. त्याने या प्रकरणाची माहिती अकोट फैल पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मृतदेह छिन्नविछीन्न नग्नावस्थेत आढळून आल्याने पोलिसही अवाक् झाले. या घटनेने अकोट फैल परिसर हादरून गेला. शेख फिरोज यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, २०१ ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, ठाणेदार तिरुपती राणे, स्थानीक गुन्हे शाखचे अधिकारी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला काही संशयितांना ताब्यात घेतले. 
 
आलियाच्या मित्रांची केली विचारपूस 
नेहमी आलियासोबत खेळणाऱ्या चिमुकल्यांची विचारपूस पोलिसांनी केली. तसेच आलियाच्या घराशेजारी असलेल्या एका मासेविक्री करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर अनेक संशयितांची चौकशी पोलिसांन सुरु केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...