आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीचे खून प्रकरण; आरोपींना अटक, पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शिटाकळी- तालुक्यातील दगडपारवा येथील युवतीच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या तिच्याच कुटुंबातील चौघांना बार्शिटाकळी पोलिसांनी मे रोजी सायंकाळी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्यांना मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दगडपारवा येथील राधा मगन सतिशे या युवतीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिचे वडील मगन जगन सतिशे, आई शशिकला मगन सतिशे, जावई संतोष शिंदे बहीण शारदा संतोष शिंदे यांनी जंगलात नेऊन तिचा खून केला. त्यानंतर काजळेश्वर शिवारातील उजाड गाव यावलखेड येथे नाल्यात मृतदेह पुरून ते फरार झाले. दरम्यान, २९ एप्रिल रोजी वन्यप्राण्यांनी मृतदेह उकरला. याबाबत दगडपारवा येथील मनोहर सवाईराम राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मगन जगन सतिशे, शशिकला सतिशे, संतोष शिंदे शारदा शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक संजय कोरचे पोलिस हेडकाॅन्स्टेबल संजय सोनवणे यांनी दगडपारवा शेतशिवारात मे रोजी सायंकाळी आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
बातम्या आणखी आहेत...