आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा खून; पत्नीसह प्रियकरास केली अटक, पोलिसांनी अवघ्या 6 तासांत आरोपींचा लावला छडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस कर्मचारी.
खामगाव - गवंडीकाम करणाऱ्या पिंपळगावराजा गावाजवळील एका शेतात राहणाऱ्या राजेंद्र तेलंग याच्या मृत्यू प्रकरणी पिंपळगावराजा पोलिसांनी त्याची पत्नी तिचा प्रियकर अशा दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आरोपींना शिताफीने अवघ्या ६ तासांत अटक केली आहे. 
 
प्राप्त माहितीनुसार, राजेंद्र काशीराम तेलंग वय ४५ हा पिंपळगावराजा गावापासून किमी. अंतरावर असलेल्या एका शेतातील झोपडीत परिवारासह राहत होता. १६ जुलै रोजी राजेंद्र हा गवंडी काम करून घरी परतला. त्यावेळी त्याला पत्नी शालूबाई शेजारी असलेल्या शेताचे मालक मो. शाहबाज अब्दुल वहाब वय ३० रा. पिंपळगावराजा हे दोघे झोपडीमध्ये नको त्या अवस्थेत आढळले. त्यामुळे राजेंद्रचा राग अनावर झाला. त्यामुळे पत्नी पती मारेल या धाकाने घरातून बाहेर पडली आणि तिने दाराची कडी लावून तेथून निघून गेली. मो. शाहबाज राजेंद्र तेलंग यांच्यामध्ये झटापट झाली. त्यामध्ये मो. शाहबाजने राजेंद्रचा गळा दाबून छातीवर बुक्क्या मारून त्यास ठार केले. याप्रकरणी पिंपळगावराजा पोलिसांनी राजेंद्र तेलंगच्या मृत्यूप्रकरणी अाकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र शव विच्छेदन अहवालात राजेंद्रचा मृत्यू गळा दाबल्याने छातीच्या फासळ्या फ्रॅक्चर झाल्याचे नमुद करण्यात आले. यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेंद्र अहिरकर यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या सहा तासांत या दोनही आरोपींचा छडा लावून त्यांना १७ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास अटक केली असल्याची माहिती मिळाली.
 
ही कारवाई ठाणेदार अहिरकर, एएसआय श्रीकृष्ण ढोले, सुनील जाधव, श्रीराम चौधरी, पोकॉ. शीतल पहुरकर, श्यामराव मुके, पुरुषोत्तम राणे यांनी केली. मृतक हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी खुनासह अॅट्रॉसिटी अॅक्टची कलमे लावली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता प्रभारी एसडीपीओ गिरीश बाेबडे करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...