आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा गळा आवळून चोरपांग्रा शिवारात खून, सामूहिक बलात्काराचा व्यक्त होतोय संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा- लोणार तालुक्यामधील चोरपांग्रा शिवारातील एका शेतात अनोळखी महिलेचा दोराच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची घटना आज फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. नागपूर ते औरंगाबाद महामार्गाला लागून असलेल्या चोरपांग्रा शिवारामधील एका शेतामध्ये ही घटना घडली असून सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.
 
बिबी येथील जगन राठोड यांचे शेत चोरपांग्रा शिवारात एक किलोमीटर अंतरावर आहे. शाळू पिकावर बसणारी पाखरे हाकलण्यासाठी ते आज फेब्रुवारी रोजी सकाळी वाजताच्या सुमारास शेतात गेले. त्यावेळी त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तत्काळ त्यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटलांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी पोलिसांना घटनास्थळावर पाठवले. त्यानुसार बिबी, लोणार साखरखेर्डा पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला असता दोराच्या साह्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. परंतु अद्याप या महिलेची ओळख पटली नाही. महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

घटनेच्या पार्श्वभूमीवर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान या परिसरातच घुटमळले. हे श्वान आरोपींचा मार्ग काढू शकले नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावर महिलेचे काढलेले फोटो आजूबाजूच्या खेडेगावात नागरिकांना दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही महिला या भागातील नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मृत महिलेचे वय अंदाजे ४० वर्षे असून तिने अंगावर साडी परिधान केलेली होती. पायात मोजे घातलेले असून चप्पल पडलेली होती. या घातपाताविषयी नागरिक विविध तर्कवितर्क काढत आहेत. दरम्यान, सायंकाळी मृतदेह मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार महिलेची ओळख पटवून जोपर्यंत नातेवाईक येत नाहीत, तोपर्यंत दोन दिवस शवागारामध्ये मृतदेह ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी यावेळी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...