आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला: आघाडीतील बिघाडीने मुस्लिम नगरसेवकांची संख्या घटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - महापालिका निवडणुकीत मुस्लिम नगरसेवकांची संख्या घटल्याचे गत दाेन निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. सन २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांची संख्या १९ हाेती. यंदा झालेल्या निवडणुकीत ही संख्या १५ झाली अाहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील बिघाडीमुळे मुस्लिम नगरसेवकांची संख्या घटली, अशी प्रतिक्रिया राजकीय जाणकारांमधून व्यक्त हाेत अाहे. 
 
लोकसभा निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची अाघाडी हाेती. मात्र नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली. दाेन्ही पक्ष स्वबळावर लढले. दाेन्ही पक्षांच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष न.प.निवडणुकीत काही ठिकाणी अाघाडी झाली. जिल्ह्यात तीन ठिकाणी भाजपचे तर दाेन ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून अाले. त्यानंतर झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राकाॅंने काँग्रेसला पाठिंबा दिला. मात्र महापालिका निवडणुकीत दाेन्ही पक्ष स्वबळावर लढले. 

स्थानिक स्तरावर दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीसाठी प्रयत्नही केले. मात्र जागांवरुन बिनसले. अखेर दाेन्ही पक्ष स्वबळावर लढले. अशातच एमआयएमने(अाॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन ) महापालिका निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे अल्पसंख्यांक मतांचे प्रचंड विभाजन झाले. परिणामी मुस्लिम नगरसेवकांची संख्या घटल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे अाहे. 
अायातउमेदवारांमुळे बिघाडी ? : महापालिकानिवडणुकीच्या पृष्ठ भूमीवर काॅंग्रेससह १० नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हाेता. या निवडणुकीत या सर्व उमेदवारांना त्यांच्या साेयीची प्रभागांमधून उमेदवारी देण्या वरुन दाेन्ही काँग्रेसमध्ये एकमत हाेत नव्हते. अनेकदा चर्चाही झाल्या. जागाही कमी जास्त लढण्यावरुनही बाेलणी झाली. मात्र यश अाले नाही. 
 
मुस्लिमांचा हात काॅंग्रेसके साथ 
२०१२ च्या मनपा निवडणुकीत ७२ वाॅर्डांतून १९ मुस्लिम उमेदवार निवडून अाले हाेते. यात काॅंग्रेसचे ८, राकाॅंचे ५, युडीएफ-२, समाजवादी पार्टीचा १, तीन अपक्षांचा समावेश हाेता. २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेस ११, राकाॅंच्या २, अपक्ष १, एमअायएमच्या एक नगरसेवकाचा समावेश अाहे. निवडून अालेल्या नगरसेवकांत रहिम पेंटर, खान अजरा नरसीन मुकसद खान, शेख अख्तर बी हनीफ, शेख माे. इक्बाल सिद्धीक, जाधव सवणरखा ववजय, साजिद खान मन्नान खान पठाण, माे. इरफान अब्दुल रहमान, माे. मुस्तफा माे. युसूफ, जैनबी शेख इब्राहिम, झका उल हक अब्दीुल हक, डाॅ. झिशान हुसेन, खान शािहन अंजुम महेबुब, खान फैय्याज अब्दुला खान, खान फिराेज अलियार खान यांचा समावेश अाहे. निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी राकाॅंपेक्षा काॅंग्रेसला साथ दिल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. 
 
‘एमअायएम’चा प्रवेश 
अल्पसंख्यांक दलित मतांवर दाराेमदार असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस भारिप-बमंसने काही प्रमाणात का हाेईना एमअायएचा धसका घेतला हाेता. महापालिका निवडणुकीत एमआयएमतर्फे अाजी, माजी नगरसेवकांना संधी देण्यात अाली हाेती. सत्ताधारी केवळ हिंदू वस्त्यांमध्ये विकासाची कामे करीत असल्याचा अाराेप एमआयएमचे नेते सय्यद माेईन यांनी २३ जानेवारी राेजी जुने शहरात पार पडलेल्या सभेत केला हाेता. खैर माेहम्मद प्लाॅट, भगत वाडी, खदान, अाकाेट फैल, नायगाव , गंगा नगर यासारख्या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये विकासाची कामे का करण्यात येत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला हाेता. त्यामुळे एमआयएम अाता महारानगराच्या राजकारणात कितपत पाय राेवणार हे येणाऱ्या स्पष्ट हाेईल. 
बातम्या आणखी आहेत...