आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे आज चिखलीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - अनुराधा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे सचिव, आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून जेनरिक औषधी कमी माफक दरात अनुराधा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, चिखली द्वारे संचालित सिद्धीविनायक हेल्थ केअरच्या माध्यमातून उपलब्ध होणार अाहे. 
या जेनरिक मेडिकलचा शुभारंभ नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डाॅ. सुरेश छाजेड राहणार असून, जिल्हाधिकारी डाॅ. विजय झाडे, ज्येष्ठ नेते राधेश्याम चांडक,केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर, इंडीयन मेडीकल असोसिएशन, चिखलीचे अध्यक्ष डाॅ. ए. एम. वसु मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे सचिव आमदार राहुल बोंद्रे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

गुरुवारी जानेवारी राेजी सकाळी ११ वाजता अनुराधा अर्बन बँकेजवळ हा कार्यक्रम होणार आहे. जेनरिक मेडिकलच्या उदघाटनास  उपस्थित राहून या सेवाभावी वैद्यकीय उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...