आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे आठ बळी, वारसांना ३२ लाख, पशुपालकांनाही मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- जूनते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीने आठ जणांसह दीडशे जनावरांचा बळी घेतला आहे. यापैकी पुरात वाहून गेलेल्या आणि अंगावर वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासनाने ३२ लाख रुपये, तर नैसर्गिक आपत्तीमुळे दगावलेल्या दीडशे जनावरांच्या मालकांना पाच लाख १९ हजार रुपयांची मदत दिली आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येप्रमाणेच नैसर्गिक आपत्तीतील बळींच्या संख्येचाही आलेख चढता असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

काही वर्षांपासून होत असलेली प्रचंड वृक्षतोड, औद्योगीककरणामुळे वाढत चाललेले प्रदूषण यासह अन्य कारणांमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. काही वर्षांपूर्वी एप्रिल किंवा जून महिन्यात वीज आणि ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावत होता. त्यावेळी अंगावर वीज पडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण फार कमी होते. मात्र, मागील दोन-तीन वर्षांच्या कालावधीत कोणत्याही महिन्यात वीज ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसातही विजेचे प्रमाण जास्त राहत आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून रब्बी पिकाचे मोठे नुकसान केले होते. ावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जिल्ह्यात कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल आठ जणांना जीवास मुकावे लागले आहे. त्यामध्ये पुरात वाहून गेलेल्या तीन जणांचा, तर अंगावर वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या पाच जणांचा समावेश आहे. बुलडाणा, मोताळा जळगाव जामोद तालुक्यात प्रत्येकी दोन, तर सिंदखेडराजा तालुक्यात नैसर्गिक आपत्तीची एक घटना घडली आहे. तसेच दीडशे जनावरांचा मृत्यू झाला. खामगाव तालुक्यात ९१ जनावरांचा बळी गेला. त्यामध्ये ६७ दुधाळ जनावरे, ओढकाम करणाऱ्या एका मोठ्या आणि २३ लहान जनावरांचा समावेश आहे.

अशी घ्यावी खबरदारी
^अवकाळीपावसासह विजेचा कडकडाट होत असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. शेतात काम करत असल्यास उंच मोठ्या झाडाखाली थांबता खोलगट भागात दोन्ही गुढघ्यांच्या आत मान कानावर हात ठेवून लहान झुडपात बसावे. सामूहिकरित्या एकाच ठिकाणी थांबू नये. शेतात पक्के घर असल्यास त्यामध्ये आश्रय घ्यावा. डॉ.चंद्रकांत जायभाये, कृषी संशोधन केंद्र

मदतीत तीन लाखांची वाढ
यापूर्वीनैसर्गिक आपत्तीत बळी ठरलेल्या मृतकाच्या वारसाला एक लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. मात्र, आता शासनाने या मदतीत तब्बल तीन लाख रुपयांनी वाढ केली आहे.

दीडशे जनावरांचा मृत्यू
मागीलचार महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे लहान-मोठ्या दीडशे जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात तीन, चिखली तीन, देऊळगावराजा तीन, सिंदखेडराजा दहा १०, लोणार दोन, मेहकर १२, खामगाव ९१, मलकापूर तीन, मोताळा २२ आणि जळगाव जामाेद तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे.

नैसर्गिक आपत्तीतील बळींची संख्या अशी
चारमहिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे आठ जणांना आपल्या जीवास मुकावे लागले. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात अंगावर वीज पडून पुजा नरोटे, सिंदखेडराजा येथील राधेश्याम जाधव, मोताळा येथील संगीता समाधान तायडे, जळगाव जामोद तालुक्यातील अनिल गोविंद मैद आणि अंजना प्रकाश वानखेडे यांचा समावेश आहे. पुरात वाहून गेलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील राजू कडूबा मोरे, मोताळा तालुक्यातील तानाजी अंबुसकर आणि जळगाव जामोद तालुक्यातील निवृत्ती नारायण झाल्टे यांचा समावेश आहे.