आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दिवस निर्माल्य रथ येणार थेट तुमच्या घरी, शहरात अनेक ठिकाणी ठेवण्यात येणार कुंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करण्यासाठी पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. घरी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लोकांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा केला जात असला तरी निर्माल्य विसर्जनाचा मोठा प्रश्न आजही आहेच.
 
हे निर्माल्य नदीत टाकून पाणी प्रदुषणाचे प्रमाण आहेच. हीच समस्या ओळखून भारिप बहुजन महासंघाच्या मनपा गटनेच्या अॅड.धनश्री निलेश देव यांनी निर्माल्य कुंड, निर्माल्य रथ उपलब्ध करून दिले आहे. सप्टेंबर रोजी हे रथ थेट तुमच्या घरी येणार असून, नागरिकांनी, गणेशोत्सव मंडळांनी या दोन दिवसात निर्माल्य रथातच निर्माल्य विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदी, गणेश घाट येथे विसर्जन करून पाणी प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. या समस्येला उपाय म्हणून अॅड. धनश्री देव यांनी निर्माल्य कुंड उपलब्ध करून दिले आहेत. जमा झालेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीला निर्माल्य कुंडात निर्माल्य येऊन टाकणे शक्य होत नाही. त्यामुळे निर्माल्य रथाची संकल्पना सुरू करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरी, सोसायटीमध्ये, परिसरात निर्माल्य जमा करून निर्माल्य रथासाठी फोन करायचा आणि हे रथ थेट तुमच्या भागात येऊन निर्माल्य जमा करेल. सोमवार, सप्टेंबर आणि मंगळवार सप्टेंबर रोजी हा रथ शहरातील विविध भागात येणार आहे. शिवाय गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे मंगळवार, सप्टेंबर रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत विविध ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात येणार आहे. तुमच्या भागात निर्माल्य रथ येण्यासाठी नागरिकांनी, गणेशोत्सव मंडळांनी ७७९८८८०३५५ किंवा ९८६०१२२५५५ या क्रमांकावर फोन करावा, असे आवाहन करण्यात आला आहे. 
 
येथे आहे निर्माल्य कुंडाची व्यवस्था 
गणेशविसर्जनाच्या दिवशी म्हणजे सप्टेंबर रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत विविध ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात येणार आहे. यात ज्योती नगर येथील श्री सिध्दीविनायक मंदिर, शंकर नगर येथील आशिर्वाद अपार्टमेंट, स्व. बाजीराव पेशवे मार्ग गड्डम प्लाट, सातव चौक, निखिलेशजी दिवेकर यांच्या घरासमोरील चौक प्रसाद कॉलनी, रामदार पेठ येथील मुकुंद मंदिर, रामदास पेठ येथील श्री दत्त मंदिर, उत्तरा कॉलनी येथील मिरगे सर यांच्या घरासमोर, गुप्ते रोड येथील लहरीया यांच्या घरातील राम मंदिर समोर, न्यु तापडीया नगर येथील श्री गजानन महाराज मंदिर निर्माल्य कुंड ठेवण्यात येणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...