आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल्हारा पायी जाणाऱ्या दिंडीतील ट्रॅक्टरला धडक बालकाचा जागीच मुत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
तेल्हारा - तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर येथून शेगावकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार घडकेत तीन वर्षीय सोहम विठ्ठल वारुळकर हा चिमुकला वारकरी जागीच ठार झाला तर अन्य तिघे वारकरी जखमी झाले. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता कवठा फाट्यानजीक घडली. वाडी अदमपूर दिंडीत वाडी, इसापूर, वाकोडी, वरूळा पंचक्रोशीतील एक हजार वारकरी सहभागी झाले आहेत. ही दिंडी निंबा फाटा मुक्काम आटोपून सकाळी वाजता शेगावकडे मार्गस्थ झाली होती. निंबा फाट्यापासून कि. मी. अंतरावर कवठा फाट्याजवळ या दिंडीतील ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३0-६१४३ ला शेगाववरून निंबा फाट्याकडे द्राक्ष भरून जाणाऱ्या मालवाहू वाहन क्र. एमएच ३० बी ४०७२ ने ट्रॉलीच्या मध्यभागी जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की ट्रॉली फूट अंतरावर तुटून पडली. यामध्ये ट्रॉलीमध्ये चिमुकला वारकरी सोहम विठ्ठल वारुळकर हा जागीच ठार झाला तर आदीत्य शिवहरी वारुळकार, तन्वी शिवहरी वारुळकार हे गंभीर जखमी झाले.तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...