आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: कर्जमाफीच्या अर्जांचा आकडा पोहोचला 1.36 लाखांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा आकडा आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत 1 लाख ३६ हजारांवर पोहोचला आहे. यापैकी 1 लाख १६ हजार अर्ज परिपूर्णरित्या भरल्या गेल्याचे संबंधित यंत्रणेचे म्हणणे असून उर्वरित २० हजार अर्जांचे ‘अपडेशन’ प्रगतीपथावर आहे.
 
शासनाने दिलेल्या मुदतीनुसार उद्या, शुक्रवार १५ सप्टेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे १६ तारीख सुरु होईपर्यंत अर्थातच शुक्रवारच्या मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज दाखल करता येतील. यासाठी जिल्ह्यात २६३ अधिकृत केंद्रे उघडण्यात आली आहेत.महसूल यंत्रणेची महा सेवा केंद्रे, नव्याने उघडण्यात आलेली सुविधा केंद्रे, तहसील कार्यालयांतील सेतू आणि सायबर कॅफे अशा सर्वच ठिकाणी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. उद्या शेवटचा दिवस असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी या सेवांचा लाभ घेऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन महसूलेने केले आहे. 
 
८४% शेतकऱ्यांनी भरले अर्ज : कर्जमाफीसाठीपात्र असलेल्या खातेदार शेतकऱ्यांची संख्या लाख ६३ हजार आहे. त्यापैकी ८३.४३ टक्के शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले असून केवळ १६ टक्के शेतकऱ्यांचे अर्ज दाखल व्हायचे आहेत. यापैकी तीन-चार टक्के शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे भरलेच जाणार नाहीत, असा अंदाज आहे. उर्वरित शेतकऱ्यांना उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज दाखल करता येतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...