आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार पंचायत समित्यांवर येणार आता महिलाराज, सभापती आरक्षण जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण २३ जून रोजी जाहीर झाले. यात सातपैकी चार पंचायत समितींचा कारभार आता महिला पाहणार आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणानंतर पंचायत समिती सभापतिपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. गुरुवारी पंचायत समिती सभापतिपदाच्या आरक्षणानंतर अनेकांची राजकीय समीकरणे चुकली. पातूर, बार्शिटाकळी, बाळापूर, तेल्हारा येथे महिला सभापतीचे आरक्षण जाहीर झाले. बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर पातूर या पाच पंचायत समितीचे सभापती भारिप-बहुजन महासंघाचे आहेत. अकोला मूर्तिजापूर पंचायत समितीत सेना, भाजपची सत्ता आहे. येथे पक्षीय बलाबलानुसार भारिप-बमसंला थारा दिसत नाही. या ठिकाणी बाजी मारणे भारिपला कठीण जाणार आहे. प्रत्येक पक्षाकडेे आरक्षण जाहीर झालेल्या प्रवर्गाचा उमेदवार आहे. पण, इतर सदस्य कितपत साथ देतात यावर सभापतिपद कोणत्या पक्षाकडे जाते हे ठरणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग या उमेदवाराकडे गेले असल्याने अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीच परिस्थिती सभापती पदाबाबतीत झाल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

पंचायत समितींच्या सभापतिपदाचे असे आहे आरक्षण
-अकोला एस.सी.
-अकोट सर्वसाधारण
-तेल्हारा सर्वसाधारण ( महिला )
-पातूर एस.सी. (महिला)
-बार्शिटाकळी एस.टी. (महिला)
-मूर्तिजापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग
-बाळापूर ना.मा.प्र (महिला)
बातम्या आणखी आहेत...