आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याच्या जलदूत रेल्वेला होणार विलंब, पाणी भरण्याचे कार्य सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मराठवाड्याची तहान शमवण्यासाठी अकोला रेल्वेस्टेशनवर दाखल झालेल्या रेल्वे टँकरमध्ये बुधवारी दुसऱ्या दिवशीही पाणी भरणे सुरूच होते. पण त्याची गती अतिशय धिमी असल्यामुळे हे पाणी भरण्यास विलंब होत आहे. पाणी भरल्यानंतर हे टँकर मराठवाड्यासाठी रवाना होणार आहेत.

मराठवाड्यात पाण्याचे अभूतपूर्व जलसंकटावर उपायांचा एक भाग म्हणून अकोल्यातूनही सहा टँकर रवाना केले जाणार आहेत. यापैकी दोन टँकर वाशीम िजल्ह्याच्या अमानतवाडी येथून भरून आणण्यात आले असून उर्वरित चार टँकर येथील रेल्वेस्थानकात भरले जात आहेत. टँकरमध्ये पाणी भरण्याचे हे कार्य मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाले. मात्र बुधवारी मध्यरात्रीपर्यंतही ते पूर्ण झाले नव्हते. विश्वसनीय सूत्रांनुसार पाण्याची सध्याची गती अपेक्षित धरली तर ७० हजार लिटर क्षमतेचा एक टँकर भरायला अंदाजे ३० तासांचा कालावधी लागतो. सध्या चारही टँकरमध्ये एकाच वेळी पाणी भरणे सुरू आहे. त्यामुळे ही वॉटर रेल्वे गुरुवारी अकोला स्टेशन सोडेल, असा अंदाज आहे.

आणखी पाण्याचा निर्णय डीएमआरकडूंन
पाण्याचे सहा टँकर पाठविल्यानंतर आणखी पाणी पाठवावे लागणार काय, याचे नेमके उत्तर रेल्वेच्या स्थानिक प्रशासनाकडे नाही. कोणत्याही भागात पाणी पाठवावयाचे असेल तर तशी मागणी रेल्वेच्या भुसावळ स्थित विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे (डीआरएम) केली जाते. त्यांच्या सूचनेनंतर कोठून पाणी आणायचे, याचा निर्णय घेतला जातो.
लातूरबाबत तत्परता; सांगलीस ताठरता
सांगली | लातूरला पाणीपुरवठा करण्यात तत्परता दाखवणाऱ्या राज्य सरकारने सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दुष्काळी गावांना मात्र टेंभू योजनेची पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी खरीप आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी प्रसंगी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी देऊ, पण पाणीपट्टी भरावीच लागेल, असे स्पष्ट केले.
टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास अाटपाडी तालुक्यातील गावांना दिलासा मिळेल, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी बैठकीत मांडली. यावर टेंभू योजनेच्या अधिकाऱ्याने लाभक्षेत्रातील आटपाडी तालुक्यातील शेवटच्या गावांनी पाणीपट्टी भरली आहे; मात्र आधीच्या काही गावांनी पाणीपट्टी भरली नसल्याने पाणी सोडता येणार नाही, असे
स्पष्टपणे बजावले.
सांगितले. पाणी सोडण्यासाठी येणारा खर्च मोठा असून त्या तुलनेत पाणीपट्टी कमी जमा झाली असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावर पाटील यांनीही आधी पाणीपट्टी भरावी लागेल, मगच पाणी मिळेल. प्रसंगी पाणीपट्टी भरलेल्या गावांना टँकरने पाणी देवू, अशी भूमिका घेतली.
मागणी तिथे चारा छावणी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचा मुद्दा भाजचे आमदार विलासराव जगताप यांनी उपस्थित केला. तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनीही चारा छावण्यांसाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३ मे रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मागणी तिथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.