आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील युवतींमध्ये ‘फ्लोरल प्रिंट’ची क्रेझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पावसाळ्यातनिसर्ग जसे हिरवेगार, नानाविध रंगांच्या फुलांनी नटलेले असते, तसेच पाना-फुलांच्या डिझाइनचे ड्रेस तरुणीना आकर्षित करत अाहे. जीन्सवरील टॉप असो की पंजाबी सूट, सर्व ड्रेस प्रकारामध्ये फुला- पानांची डिझाइन युवतींच्या पसंतीस उतरत आहे. सध्या युवतींमध्ये फ्लोरल प्रिंटची क्रेझ अधिक असल्याचे दिसून येत आहे.
बदलत्या ऋतुनुसार फॅशनमध्येदेखील बदल झालेला असतो. रोज नवनवीन डिझाइन तयार होतात, तर काही जुन्या डिझाइनला वेगळे रूप दिले जाते. फॅशन जगतात होणारे बदल युवतींना आकर्षित करणारे असते. सध्या युवतींसाठी असणाऱ्या विविध ड्रेसच्या प्रकारांमध्ये फ्लोलर प्रिंटला सर्वाधिक पसंती मिळत आहे. यात पांढऱ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर रंगबेरंगी डार्क शेड्स मधील फुलांची डिझाईनची अधिक चलती आहे, तर काही प्रमाणात डार्क शेडच्या बॅकग्राऊंडवर फिक्कट रंगातील फुलांची प्रिंटदेखील युवतींच्या पसंतीस उतरत आहे. कॉन्ट्रास्ट रंगातील, लहान मोठ्या आकारातील तसेच नानाविध प्रकारच्या फुलांची, पानांची डिझाइन आकर्षक ठरत आहे. नुसत्या पिंपळाच्या पानांची डिझाइन, तसेच काही चित्रविचित्र पानांची डिझाइनलादेखील मागणी वाढत आहे.

जॉर्जेट, लिनेन, कॉटन सिल्क अशा फॅब्रिकमध्ये हे डिझाइन अधिक खुलून दिसते. जिन्सवरील टॉप, कुर्ती, स्कर्ट एवढेच काय, तर फ्लोरल प्रिंटची जीन्सनेदेखील तरुणींना भुरळ घातली आहे. सलवार आणि ओढणी फ्लोअर प्रिंटेट, तर कुर्ती प्लेन रंगातील परिधान करण्याची सध्या फॅशन आहे. या पावसाळ्यात निसर्गाप्रमाणेच युवतींचे ड्रेसदेखील रंगबेरंगी फुलांनी नटलेले पाहायला मिळत आहे.