आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेणीमध्ये छायाचित्रकारांचे "फ्लॅश', लवकरच बेस्ट अजिंठा लेणीचे फोटो प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जागतिकछायाचित्र दिनानिमित्त अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतून आलेल्या अनेक फोटोग्राफर्सने दिवसभर अजिंठा लेणी कॅमेरात टिपली. अकोला येथे लवकरच बेस्ट अजिंठा लेणीचे फोटो प्रदर्शन भरणार असून त्यात बक्षिसे दिली जाणार आहेत.

१९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफर्स दिवस म्हणून साजरा केला जातो. वपळीच्या दिवसात एक विरंगुळा म्हणून अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील अनेक फोटोग्राफर्सनी बुधवारी अजिंठा लेणीला भेट दिली. शेकडो जणांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कॅमेऱ्यात कैद केली. यापैकी एकाला अकोल्यातील प्रदर्शनात बेस्ट लेणीच्या फोटोबद्दल पुरस्कार दिला जाणार आहे. दरम्यान, अजिंठा येथील शुभम फोटोचे संचालक कल्याण सिंग राजपूत यांनी सर्व फोटोग्राफर्सचे स्वागत करून नाश्ता दिला. स्वागत कार्यक्रमात विजय पगारे, शांताराम वाघ, दीपक माळी, शिवाजी चव्हाण, कुलदीप ठाकूर, प्रशांत गुप्तासह अजिंठयातील फोटोग्राफर्सनी त्यांचे स्वागत केले.
फोटोग्राफर्सचे आयुष्य म्हणजे रोज धावपळीचे असते. छायाचित्र दिनानिमित्त आम्ही एकत्र जमलो. सर्वांनी सोबत लेणीचे फोटो काढून सहल एन्जाॅय केला.'' भावरावकराडे, वडगाव, अकोला.

फोटोग्राफर्सचे आयुष्य धावपळीचे
अजिंठ्यातील लेणीचा घेतलेला फोटो.
सर्व एकत्र
आम्हीआमच्या पद्धतीने रोज फोटो काढतो. नवीन कला काही माहीत होत नाहीत. फोटोग्राफर्स दिनानिमित्त आम्ही सगळे एकत्र जमलो एकमेकांची कला जाणून घेतली.'' सुनीलकाळाणे, फोटोग्राफर्स, अकोला.

शहरात भरणार प्रदर्शन
दरवर्षीजागतिकफोटोग्राफर्स दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील फोटोग्राफर्स बेस्ट फोटो म्हणून प्रदर्शन भरवतात. त्या प्रदर्शनात एकच विषय दिला जातो. यावर्षीचा विषय अजिंठा लेणी होता. त्यामुळे फोटोग्राफर्सनी अाज दिवसभर अजिंठा लेणीचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले. फॉटोग्राफर्सनी अजिंठा लेणी येथे माहिती शिबिर घेतले.