आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाणेदारालाच खाकीच्या अज्ञानाचा बसला फटका, नजरचुकीने ठाणेदारावरच दाखल केला गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- न्यायालयाचा आदेशच पोलिसांना समजला नसल्याने त्यांनी चक्क ठाणेदारावरच गुन्हा दाखल केला आहे. सिटी कोतवाली पोलिसांच्या चुकीमुळे संबंधित ठाणेदारांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. आता आमची चूक झाली, असे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे.
अकोला पोलिस दलातील पोलिस कर्मचारी संजय व्यंकटराव चक्रनारायण यांना तीन कोटी ४७ लाखांची लॉटरी लागली. मात्र, लॉटरीची रक्कम देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. त्याची तक्रार आधी पोलिस ठाण्यात केली. राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तक्रार देण्यासाठी ते दिल्लीला गेले. मात्र, ग्राहक संज्ञेत हा विषय मोडत नसल्यामुळे तेथून त्यांना स्थानिक न्यायालयात धाव घेण्याचे सांगितले. त्यानंतर चक्रनारायण यांनी अकोला न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रमुख यांना संबंधित कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश दिले. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ समजल्यामुळे पोलिसांनी तत्कालीन ठाणेदारासह प्लेविन रिटेलर किंवा क्लेम डिपार्टमेंट पॅन इंडिया नेटवर्क वरळी, मुंबई डायरेक्टर ऑफ स्टेट लॉटरी सिक्कीम सरकार गंगटोक, प्लेविन रिटेलर किंवा क्लेम डिपार्टमेंट पॅन इंडिया नेटवर्क लि. सहावा मजला कोहिनूर सिटी कुर्ला मुंबई, भारत सॉफ्टवेअर आयएनसी नागपूर ४९३ समित अपार्टमेंट, नागपूर अकोल्यातील लॉटरी विक्रेता नितीन मुरलीधर गोयनका यांच्याविरुद्ध भादंवि गुन्हे दाखल केले.

पोलिसठाणे म्हणते, ही डे ऑफिसरची चूक :
सिटीकोतवाली पोलिसांनी न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ही डे ऑफिसरची नजरचूक आहे. त्यांच्या नजरचुकीने प्रथम खबरीचे फॉर्म बी मध्ये आरोपी क्रमांक पीएसओ सा. पीएस कोतवाली असे नमूद झाले आहे. तरी सदर गुन्ह्यात माननीय विद्यमान न्यायालयाने आदेशानुसार वर नमूद आरोपी क्रमांक ते असे एकूण चार आरोपी आहेत. त्यामुळे प्रथम खबरीमधून आरोपी क्रमांक पोलिस निरीक्षक सिटी कोतवाली यांना वगळावे, असेही म्हटले.
आता पोलिसांची धावाधाव
तत्कालीनठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आदेशाचा अर्थच न समजल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखलची चूक करावी,तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित आहे.
बातम्या आणखी आहेत...