आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : काँग्रेसला काटशह देण्यासाठी अाता विरोधी गटात खलबते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत विरोधकांची संख्या घटली आहे. मात्र सत्तेचे राजकारण बघता विरोधी पक्षातही एकमेकांना शह-काटशह देण्याचे राजकारण सुरु आहे. विरोधी पक्षातील दोन गट एकत्र येण्याच्या तयारीत अाहेत. या अनुषंगाने या दोन्ही गटात खलबते सुरु असून ही खलबते यशस्वी झाल्यास काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
महापालिकेत भाजपला ४८ जागा मिळाल्या. तर एक अपक्ष नगरसेविकाला सोबत घेऊन भाजपने आपले संख्याबळ ४९ केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसंची साथ घेतली तर शिवसेनेने अपक्ष नगरेसवकाची. यामुळे या दोन्ही गटांचे प्रत्येकी दोन सदस्य स्थायी समितीत जाणार आहेत. या सर्व घडामोडी स्थायी समिती सदस्य तसेच स्विकृत नगरसेवक नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आहेत. महापालिकेत एकुण पाच स्विकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. यात भाजपचे तीन तर काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त होणार होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसं तसेच एमआयएमला सोबत घेतल्याने त्यांचे संख्याबळ झाले आहे. हे समिकरण लक्षात घेऊन शिवसेनेने एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन शिवसेना आघाडीचे संख्याबळही केले आहे. या मुळे स्विकृत नगरसेवक नियुक्तीत पेच निर्माण झाला आहे. ही राजकीय खलबते एवढ्यावरच थांबलेली नाहीत. तर आता विरोधी पक्षनेतेपदासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपनंतर दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष म्हणुन कॉग्रेस आहे. त्यामुळे नियमानुसार सत्ताधारी गटानंतर दुसऱ्या क्रमाकांच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. कॉग्रेसने तसे पत्रही महापौरांना दिले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉग्रेसच्या १३ सदस्यांपैकी काही सदस्यांना विद्यमान गटनेत्यांनी विरोधी पक्षनेता व्हावे, असे वाटत नाही. ही संख्या कमी असल्याने कॉग्रेस मध्ये फुट पडण्याची शक्यता धुसर आहे. परंतु यामुळेही लोकशाही आघाडी आणि शिवसेना आघाडी एकत्र येण्याची बोलणी सुरु झाली आहे. त्यामुळे लोकशाही आघाडीने शिवसेना आघाडीला अथवा शिवसेना आघाडीने लोकशाही आघाडीला पाठींब्याचे पत्र दिल्यास या दोन्ही गटाचे संख्याबळ १८ होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणे सहज शक्य आहे. या अनुषंगाने खलबते सुरु आहेत. एकमेकांना पाठींब्याचे पत्र देऊन अडीच-अडीच वर्ष विरोधी पक्षनेतेपद वाटुन घेण्याची प्राथमिक बोलणी सुरु आहे. या पर्यायासोबतच दोन गटापैकी एका गटाने स्विकृत सदस्यावर पाणी सोडायचे तर दुसऱ्या गटाने कायम पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद ताब्यात ठेवायचे, असा दुसरा पर्यायही समोर येत आहे. परंतु शिवसेना स्विकृत सदस्यावर पाणी सोडणार नाही तर राष्ट्रवादी कॉग्रेस, भारिप-बमसं आणि एमआयएम यांची आघाडीच मुळात स्विकृत सदस्याची निवड होण्याकरीता झालेली आहे. 
 
ईश्वर चिठ्ठी निवडीवर अवलंबुन 
स्विकृतसदस्यांची निवड करताना लोकशाही आघाडी आणि शिवसेना आघाडीचे प्रत्येकी सदस्य आहे. यापैकी एका गटाचा स्विकृत नगरेसवक नियुक्त केला जाईल. या दोन गटापैकी कोणत्या गटाचा स्विकृत नगरसेवक नियुक्त करायचा? याचा निर्णय ईश्वर चिठ्ठीने घेण्याचा निर्णय झाल्यास आणि तसे प्रत्यक्षात घडल्यास हे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...