आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गरिबांचा फ्रीज’ही आता दिडशे रुपयांवर, व्यावसायिकांनी थाटली शीतपेयाची दुकाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - उन्हाचीचाहुल लागताच शहरातील फरशी, महात्मा गांधी उद्यान, मेनरोड आदी भागात गरीबांचे फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठ, मटके, सुरई यांची दुकाने थाटण्यात आली आहे. परंतु यंदा गरिबांच्या फ्रीज महागलेला दिसुन येत आहे. तर शहरात ठिकठिकाणी व्यावसायिकांनी शितपेयाची दुकाने थाटली आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. 
 
शहरातील थंडीने गेल्या ते दिवसापासुन काढता पाय घेतला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला असून घरोघरी पंखे, कुलर, एसीचा जोर वाढला आहे. शहरात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाढत्या उन्हामुळे आता तहाण जाणवू लागली आहे. 

शरीरातील उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी प्रत्येक जण थंडगार पाण्याकडे वळु लागले आहे. व्यावसायिकांनी शहरात ठिकठिकाणी शितपेयांची दुकाने थाटली आली. अनेक रसवंती विक्रेत्यांनी पण आपली दुकाने लावली आहे. श्रीमंत मंडळी फ्रीज मधील थंडगार पाणी पिऊन तर गरीब आपल्या घरातील माठ-मटक्यातील पाणी पिऊन तहान भागवत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळा चांगलाच जाणवनार आहे. तापमानात झालेली वाढ यामुळे जागोजागी नागरिक झाडांच्या सावलीच्या शोधात असल्याचे चित्र शहरात दिसुन येत आहे. गेल्या वर्षी मटक्याची किंमत १०० ते १२० रुपया पर्यंत होती. पण यंदा किमतीत २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मोठा माठ ४०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान मिळत होता. तसेच यंदा मोठा माठ ५५० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत आहे. दरवर्षी शहरात कलकत्ता येथील लाल रंगाचे मटके घेऊन येतात. परंतु अद्याप पावेतो त्यांचे शहरात आगमन झालेले नाही. ते मटके मॅटेडोर मध्ये भरुन आणतात नागरिकांच्या वर्दळीच्या रस्त्यावर जेथे रिकामी जागा भेटेल तेथे आपला माल खाली करतात आणि तेथेच आपले दुकान थाटतात. जो पर्यंत त्यांचा संपुर्ण माल विकल्या जात नाही तो पर्यंत त्यांचे बस्तान तेथेच असते. शहरात येत्या काळात विविध संस्था, संघटनांकडून पाणपोई लावण्यात येणार आहे. त्यामुळे बऱ्याचपैकी तहान भागवून नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच आरओ कॅनचे पाणी कमी दरात मिळत असल्याने आरओ कॅनच्या मागणीत देखील वाढ झालेली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होत असून काळजी घेणे गरजेचे आहे. 

तापमान वाढताच माठ, मटक्यांची मागणी वाढेल 
- माठ, मटके करण्यासाठी लागणारी माती लिदच्या किंमतीत वाढ झाल्याने पर्यायाने यंदा माठ मटक्यांच्या किंमतीत वाढ करावी लागली. जस जसे ऊनाचा पारा वाढेल त्याप्रमाणे माठ मटक्यांची मागणी वाढेल. सध्या याची फारशी मागणी नाही. चिकाणे,माठ विक्रेता, खामगाव 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...