आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिधन: मोदींच्या नागपूर दौऱ्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात धावपळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कायार्यालयातील बैठकीला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विजय झाडे. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कायार्यालयातील बैठकीला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विजय झाडे.
बुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ एप्रिल रोजी नागपूर येथे अंतीम डिजीधन मेळावा होणार आहे. त्याला फक्त चार दिवसच राहिले असल्याने प्रशासकीय धावपळीला वेग आला असून, त्यानुषंगाने रोखरहीत व्यवहारांचे महत्त्व उपयोगिता सांगण्यासाठी बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी आज १० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतली. या वेळी अाधार क्रमांक बँक खात्याला संलग्न करण्याच्या मोहीम राबविण्याच्या सूचना देत विविध कार्यक्रम बँकांनी आयोजित करण्याचे आवाहन केले. रोखरहीत व्यवहारासंदर्भात बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भी नेमाने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रोते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे राजेश परब, महाराष्ट्र बँकेचे मुरघाटे आदी उपस्थित होते. 
 
१४ एप्रिल रोजी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम डिजिधन मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त व्यवहार हे कॅशलेस म्हणजे रोखरहीत व्हावे, यावर जोर दिला जात असून बँकांनीही याबाबत जनजागृती करावी, याकरिता जिल्ह्यात हालचालींना वेग आलेला आहे. दरम्यान, आज १० एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. 
 
याप्रसंगी बँक प्रतिनिधींनी विविध विषय मांडले. बैठकीला बँक प्रतिनिधींसह संबंधित विभागांचे
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बँकेचे खाते क्रमांक आधार क्रमांकांशी संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, डिजीटल ट्रान्झॅक्शन ही लोक चळवळ झाली आहे. लोकांना या रोखरहीत व्यवहारांचे महत्व समजत आहे. रोखरहीत व्यवहारांमुळे पारदर्शकता व्यवहारांमध्ये दिसत आहे. मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा क्रमांक आधार क्रमांक एकमेकांशी संलग्न असल्यास कुठल्याच प्रकारची गडबड होत नाही. बँकांनी आपल्याकडील खातेधारकांचे आधार सीडींग करून घ्यावे. यासाठी विशेष मोहीमच राबविण्यात यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या डिजीधन मेळाव्याच्या निमित्त बँकांनी, तसेच जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत स्तरावर रोखरहीत व्यवहारांचे महत्त्व विषद करणारे कार्यक्रम घ्यावे, असे आवाहन केले. 
 
रोखरहीत व्यवहारासंदर्भात ग्रामपंचायत स्तरापर्यंत प्रक्षेपण 
अंतिम डिजीधन मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान दुपारी वाजता येणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एनआयसीने वेब लिंकच्या माध्यमातून सेतू केंद्र, ग्रामपंचायत तालुका स्तरावर करावे. रोखरहीत व्यवहारांचे प्रमाण वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न होत आहेत. या व्यवहारांचे महत्व सांगण्यासाठी बँकांनी पुढाकार घेवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये दिल्या. 
 
१८ वर्षापर्यंतच्या नागरिकांचे आधार क्रमांक काढावे 
भिम ॲप्सच्या माध्यमातून रोखरहीत व्यवहार करावे. या ॲप्सच्या उपयोगासाठी प्रचार-प्रसार करावा. त्याचप्रमाणे १८ वर्षापर्यंतच्या नागरिकांचे संपूर्ण आधार क्रमांक काढून घेण्यात यावे. तसेच बँक खातेधारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न करावे. त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांकाशीसुद्धा आधार क्रमांक संलग्न करावा. डिजीटल ट्रान्झॅक्शनला चालना देण्यासाठी प्रत्येक गावात स्वयंसेवकांच्या माध्यमातून कार्य करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...