आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस देणार कायदेशीर लढा; वकीलांची टीम तयार करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सामान्यांचे अार्थिक बजेट काेलमडून टाकण्यास कारणीभूत ठरलेल्या मालमत्ता कर वाढीविराेधात अाता काँग्रेस नेत्यांकडून कायदेशीर लढा लढण्यात येणार अाहे. मालमत्ता कराबाबत महापालिकेकडून नागरिकांना बजावण्यात येणाऱ्या नाेटीसला उत्तर देण्यासाठी काँग्रेस नागरिकांना सहकार्य करणार असून, यासाठी काही नेते अाता वकीलांची टीमच तयार करणार अाहेत. 
 
अमृत याेजनेंतर्गत शासनाकडून िवकास िनधी खेचून अाणण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत महापालिकेने मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केली. एप्रिल १७ राेजी झालेल्या सर्वसाधारण सभेत करवाढीचा निर्णय घेण्यात अाला. निवासी कर ८० टक्के तर वाणिज्य मालमत्तेसाठी कर १२५ टक्क्यांनी वाढवण्यात अाल्याचा ठराव मंजूर करण्यात अाला. त्यानंतर हा कर ३० ते ६० टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांनी करवाढीच्या समर्थन केले. या भारिप-बमसं, िशवसेना काँग्रेसने िवराेध केला. भारिप-बमसंने प्रथम जठारपेठ बंदची हाक दिली. त्यानंतर शिवसेनेने करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. शुक्रवारी या अांदाेलनात काँग्रेसने उडी घेत धरणे दिले हाेते. 

दरम्यान, काँग्रेसने मालमत्ता कर िवराेधात प्रत्येक पातळीवर लढा देण्याचा निर्धार केला असून, एकीकडे रस्त्यावर उतरून सत्ताधारी प्रशासनाला जाब िवचारतानाच दुसरीकडे कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला अाहे. प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी नागरिकांना िमळालेल्या नाेटीसला कसे उत्तर द्यायचे, यासाठी काँग्रेस नेते त्यांना सहकार्य करणार अाहेत. 

व्यापाऱ्यांचाही पाठिंबा : महापालिकेनेकेलेल्या अवाजवी करवाढीला व्यापाऱ्यांनीही िवराेध केला अाहे. याबाबत शुक्रवारी विदर्भ चेंबरची सभा झाली. महापालिकेने बाजारातील जागेसाठी रेडरेकनरच्या दरानुसार भाडेवाढ केली. परिणामी भाडे २५ ते ३० पट वाढले. काही हजारात असलेले भाडे अाता लाखांच्या घरात पाेहाेचले अाहे. त्यामुळे व्यावसायिकांचे कंबरडे माेडणार अाहे. अाधीच व्यवसायात तेजी नसून, व्यवसायातून अत्यल्प नफा िमळत असल्याने कर्जाचा डाेंगर वाढत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे अाहे. त्यामुळे करवाढ कमी करण्याची मागणी व्यावसायिकांमधून हाेत अाहे. महापालिकेने नागरिकांवर लादलेल्या करवाढीविरोधात शहरात वातावरण तयार झाले. व्यापारी, नागरिक, सामाजिक संघटना, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले आहेत. 

मालमत्ता कर वाढीचा फटका कामगार, मजुरांनाही बसणार अाहे. अाधीच वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाढा अाेढणे कठीण झालेले असताना अाता प्रचंड करवाढीमुळे पैसा काेठून अाणावा, असा प्रश्न कामगारांना पडला अाहे. तसेच व्यावसायिक कर वाढल्याने वस्तू महाग हाेण्याची शक्यता असून, शिक्षण अाराेग्य खर्चातही वाढ हाेणार अाहे. त्यामुळे मालमत्ता कर वाढविराेधी अांदाेलनात सेंटर फाॅर इंडियन ट्रेड युनियन्स, अाॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस उतरणार असल्याचे संकेत प्राप्त झाले अाहेत. लवकरच या संघटनांची संयुक्त समिती स्थापन हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे करवाढीचे आंदोलन तीव्र होणार आहे. 

नागरिकांकडून घेणार माहिती 
नाेटीससाेबत नागरिकांकडून यापूर्वीच्या कराची माहिती-पावती सादर करून घेणार अाहेत. त्यानंतर प्रत्येक नाेटीसचा स्वतंत्र अभ्यास करून उत्तर तयार करण्यात येईल. या उत्तरासाेबत अावश्यकता भासल्यास काही दस्तावेजही जाेडण्यात येतील. यासाठी वकीलांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...