आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: रुढी साेडून साडेतीन हजार रुग्णांच्या नातेवाईकांना पुरण पोळीचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनव सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी १७ वर्षांच्या प्रेरणादायी उपक्रमाअंतर्गत शहरातील साडेतीन हजार रुग्णांच्या नातेवाईकांना पुरण पोळीचे रविवारी वाटप केले. - Divya Marathi
अभिनव सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी १७ वर्षांच्या प्रेरणादायी उपक्रमाअंतर्गत शहरातील साडेतीन हजार रुग्णांच्या नातेवाईकांना पुरण पोळीचे रविवारी वाटप केले.
अकोला - होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. परंतु पुरण पोळ्या होळीत टाकता त्यांचा आस्वाद सर्वांना घेता यावा, या उद्देशाने अभिनव सेवा समितीतर्फे शहरात उपक्रम राबवण्यात येत आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन पुरण पोळ्या गोळ्या करतात, नंतर त्यांचे गरजूंना वितरण करण्यात येते. रविवारी, १२ मार्चला शहरातील साडेतीन हजार रुग्णांच्या नातेवाईकांना पुरण पोळीचे वाटप करण्यात आले. 

होलिकोत्सवात हा उपक्रम अकोल्याची ओळख झाला आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. यात समितीचा प्रत्येक सभासद आपली जबाबदारी चोखपणे बजावतो. कुणाच्याही हिताला बाधा पोहोचता स्वेच्छेने संकलन स्थळी नैवेद्यात टाकणारी एक पुरण पोळी आणून द्यावी, असे आवाहन करण्यात येते. शहरामधील डाबकी रोड, खदान,गोरक्षण रोड, मोठी उमरी,कौलखेड या भागातील कार्यकर्त्यांनी पुरण पोळीचे संकलन केले. याचा लाभ जवळपास साडेतीन हजार रुग्णांच्या आप्त स्वकीयांनी घेतला. या प्रकारे अभिनव सेवा समितीच्या माध्यमातून गेली १७ वर्षे जनसेवेचे व्रत पार पाडले जात आहे. या कार्यामध्ये समितीचे संस्थापक गणेश कावरे, डॉ. अशोक ओळंबे,अॅड. संतोष गोळे, प्रा. विजय म्हैसने, केशव अंधारे, संजय क्षार, मुकुंद धनभर, श्रीकृष्ण माळी, संदीप ठाकरे,चंद्रकांत दादा अतकरे,घनश्याम दांदळे, सुनील अवचार, कैलास गोळे,संजय मराठे, प्रमोद जोशी, चिंचोळकर, गणेश गावंडे, विजय मोडक, डांगे, श्यामली अंधारे, प्रदीप सोनखासकर, सरला मराठे,अॅड. पांडे, सीमा राजवैद्य, बेबी नंदा निचळ, प्रिया अतकरे, प्रमोद बोरकर,नारायण उंबरकर, अस्मिता सहायता बचत गट, सेवाभावी संस्थांचे सहकार्य मिळाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...