आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेळा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जुने शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करणाऱ्या ६० वर्षीय वृद्धास जुने शहर पोलिस स्टेशनच्या एका पथकाने सोमवारी नागपूरातून अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे आहेत.

जोगळेकर प्लॉट येथील रहिवासी श्रीराम खोंडे याने शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी समोर आली. सदर वृध्दाने मुलीला धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तुझ्या आईला जीवे मारील, अशी धमकी खोंडे याने अल्पवयीन मुलीला दिली. आईच्या जीवाला धोका असल्याने भीतीपोटी मुलीने वाच्यता केली नाही. तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन खोंडेने मुलीचा वारंवार लैंगिक छळ केला. यामध्ये मुलगी गर्भवती राहिली. तिच्या पोटात त्रास झाल्याने कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे नेल्यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या संदर्भात तिला विचारणा केली असता तिने श्रीराम खोंडे याने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. पोलिसांनी खोंडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को अॅक्ट) नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी वृद्ध अटकेच्या भीतीने लपून बसला होता. वृद्धाचा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर सोमवारी आरोपीस नागपूर येथून अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...