आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाला ठार मारण्याची धमकी देत पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - येथील ४२ वर्षीय पोलिस कर्मचारी संदीप गवई याने अवघ्या 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. 2016 पासून संबंधित पोलिस आपल्या मुलीच्या वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. शेवटी तिने याबाबत तक्रार दिल्यानंतर संदीपला रविवारी अटक करण्यात आली आहे. तो चक्क पोलिस मुख्यालयात काम करत होता.
 
 
आई, भावाला ठार मारण्याची धमकी
- संदीप आनंद गवई (रा. गीता नगर जुने शहर) असे आरोपीचे नाव आहे. संदीप गवई हा पोलिस मुख्यालयात नोकरीला आहे. तो विवाहित असून त्याला पीडित मुलीच्या वयाचे मुले आहेत.
- त्याने केलेल्या कुकृत्यामुळे जुने शहर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून अटक केली.
- पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, संदीप गवईने २०१६ च्या दसऱ्याच्या दिवशी अल्पवयीन मुलीला घरी बोलावले. तिला त्याने मोबाइल नंबर दिला. मला नेहमी फोन करीत रहा असे म्हटले.
- फोन केला नाही तर तुझ्या आई आणि भावाला मारून टाकीन अशी धमकीही दिली. तेव्हापासून तो त्या मुलीशी बोलत राहिला. दिवाळीनंतर पीडित मुलीची आई मामाच्या गावी गेल्यानंतर त्याने तिला घरी कुणी नसल्याचे पाहून बोलावले तिच्यावर बलात्कार केला.
- त्यानंतर जानेवारीत पुन्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीवर हा पोलिस जवळपास वर्षभरापासून बलात्कार करत होता.
 
 
नेहमी पाठलाग करायचा
पीडित मुलगी शाळेत जायची तेव्हा तो तिचा पाठलाग करायचा जवळ करण्याचा प्रयत्न करत होता. मुलगी त्याला टाळण्याचा प्रयत्न करायची. 4 जुलैला आरोपीने रात्री तिची आई घरी असताना तिच्या देखत आवाज दिला. रात्री कशाला हाक मारली म्हणून आईने विचारले असता भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने मुलीला घेऊन जुने शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदवि 376, 354 (ड) आणि 506 कलमांसह पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला. 
 

पोलिसांनी वेळ न दडवता केली अटक
पोलिस कर्मचारी आहे, म्हणून पोलिसांनी कुठलीही कसूर  न ठेवता, आरोपीविरुद्ध दखल घेत त्याला अटक केली. या प्रकारामुळे पोलिसांची मान शरमेने खाली गेल्याचे शल्य पोलिस वर्तुळात उमटले. पोलिस खात्यालाच बदनाम करणाऱ्या या आरोपीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात कुठलीही कसर ठेवणार नसल्याचे यावेळी जुने शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब घुगे यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...