आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी वाहकास अटक, तीन दिवसांची सुनावली कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर- महिलेचाबलात्कार केल्याप्रकरणी अकोला येथे कार्यरत असलेला राज्य परिवहन महामंडळाचा वाहक सचिन शेषराव सोनोने रा. कार्ला यास पातूर पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अकोला बसस्थानक परिसरातून अटक केली. सचिन सोनोनेला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
घर दाखवण्याचा बहाणा करून वाहक सचिन सोनोने याने महिलेचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार पीडित महिलेने गुरुवारी पातूर पोलिसांत दिली होती. त्यावरून सोनोनेला अटक केली. ही कारवाई ठाणेदार वाघू खिल्लारे यांच्या मार्गदर्शनात एपीआय शरद धराडे, श्रीकृष्ण पाटील, दादाराव अढाऊ यांनी केली.