आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार, पोलिसावर बलात्काराचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ग्रुन्हा दाखल करण्यात आला. 
प्रवीण रामदास टोबरे, वय ३२ असे आरोपीचे नाव आहे. तो जुने शहरातील शांतीनगरात राहत असून, ठाणे पोलिस दलात कार्यरत आहे. गेल्या वर्षभरापासून त्याची वाशीम बायपास येथील पंचशीलनगरातील २५ वर्षीय युवतीशी ओळख झाली. 
 
ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. टोबरे याने लग्नाचे आमिष देऊन वारंवार शोषण केले. त्यानंतर युवतीने लग्नाचा तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला. अखेर युवतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीकरून त्याच्याविरुद्ध अनैसर्गक कृत्य केले म्हणून गुन्हा दाखल केला. त्यामुळे तीन दिवसांतील पोलिस कर्मचाऱ्याविरुद्धची दुसरी घटना आहे. 
 
पोलिसांची पारदर्शकता 
गेल्यातीन दिवसांतील पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराच्या आरोपाची दुसरी घटना आहे. मात्र, आरोपी पोलिस कर्मचारी असतानाही त्याची पाठराखण करता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून कायदा सर्वांसाठी सारखाच असल्याचे दाखवून देऊन पोलिसांनी पारदर्शकता दाखवली. 
 
बातम्या आणखी आहेत...