आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभागात होणार लवकरच "मेगा' भरती, साडेआठ हजार पदे भरणार, रुग्णालयांना येणार आता "अच्छे दिन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- सार्वजनिकआरोग्य सेवेअंतर्गत असलेल्या सेवा संचालनालयाच्या अधिनस्थ असलेली कार्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात ८३ संवर्गांमधील पाच हजार २६७, तर गट मधील ५५ संवर्गामध्ये तीन हजार १६९ पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे हिवाळी अधिवेशनापूर्वी भरण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा संचालनालयाने भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. जवळपास साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याने जिल्हा ग्रामीण रुग्णालयांना उशिरा का होईना, चांगले दिवस येणार आहेत. पाच ऑगस्टपासून कालबद्ध कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. विहित मुदतीच्या आत कार्यवाही पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरोग्य सेवा संचालकांनी दिला आहे.

काही वर्षांपासून राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयांना मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वर्ग एक वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकारी, तर वर्ग तीनच्या अधिपरिचारिकांचा समावेश आहे. अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी त्यांना परिस्थिती नसताना आर्थिक भूर्दंड सहन करून खासगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागत आहे. सद्य:स्थितीत राज्यातील रुग्णालय कार्यालयामधील ८३ संवर्गातील पाच हजार २६७, तर गट डमधील ५५ संवर्गातील तीन हजार १६९ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय ग्रामीण रुग्णालयांमध्ये वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची ५० मंजूर पदापैकी ३७ तर वर्ग दोनच्या ११३ मंजूर पदापैकी ४४ तसेच वर्ग तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर दहापैकी पाच पाच पदे रिक्त आहेत. यावरही कळस म्हणजे यातील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे अस्थायी डॉक्टर किंवा आयुष्यच्या डॉक्टराकडून कामे करून घ्यावी लागत आहेत. बहुतांश वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दोन रुग्णालयाचा प्रभार सोपवण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रिक्त पदे असल्यामुळे आरोग्याचा डोलारा कसा सांभाळावा, असा प्रश्न जिल्हा शल्य चिकित्सकांना पडला आहे.

दरम्यान ही रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी करून विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच एक िडसेंबरपूर्वीच ही रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. त्यानुसार रिक्त पदे भरण्याच्या सूचना सहायक संचालक उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. परंतु त्यावर समाधानकारक प्रगती झाली नसल्याची खंत आरोग्य सेवा संचालनालयाने व्यक्त केली आहे.

हे अधिकारी पार पाडणार भरतीची प्रक्रिया
गटसंवर्गासाठी परिमंडळ कार्यालयाचे उपसंचालक नियुक्ती प्राधिकारी असून, गट संवर्गासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक हे नियुक्ती प्राधिकारी राहणार आहेत.

कार्यवाहीचे स्वरूप काल मर्यादा
पाचऑगस्टपर्यंत ७५ टक्के रिक्त पदे भरण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करणे. १५ ऑगस्टपूर्वी गट डमधील सर्व संवर्गांच्या बिंदू नामावल्या प्रमाणीत करणे. २१ ऑगस्ट गट डमधील रिक्त पदांची संख्या प्रमाणित बिंदू नामावलीनुसार निश्चित करून संवर्गनिहाय आरक्षणनुसार रिक्तपदाचा प्रस्ताव संचालनालयास सादर करणे, ३१ ऑगस्टपूर्वी संचालनालयस्तरावर हे प्राप्त प्रस्ताव तपासून मान्यता देणे जाहिरातीचा मसुदा अंतीम करणे, सात सप्टेंबरपूर्वी गट डच्या संवर्गांच्या पदभरतीसाठी सुयोग्य संस्थेची निवड करणे, १० सप्टेंबरपर्यंत परिमंडळ किंवा जिल्हा स्तरावर वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करणे, तसेच आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर संबंधित कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करणे. २५ सप्टेंबर ही अर्ज प्राप्तीची अंतीम तारीख राहणार आहे.

... तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
विहीतमुदतीत कालबद्ध कार्यक्रम पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ च्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सेवा संचालकांनी दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रिक्त व मंजूर पदे