आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्वसित गावातील नागरिक उद्या जंगलात; शासनाने आश्‍वासन पाळले नाही, गावक-यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - गेल्या काही वर्षात मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पासाठी जंगलाच्या गाभा क्षेत्रात असणाऱ्या काही गावाचे अकोला जिल्ह्यातील अकोट तेल्हारा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, त्यांना प्रशासनाने पुनर्वसन करताना मान्य केलेल्या कोणत्याही सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. त्या ठिकाणी शाळा, रस्ते, वीज, पाणी ग्रामपंचायत इमारत अशा कोणत्याच गोष्टी नाहीत. 
 
या गावातील वातावरण मानवल्यामुळे पुनर्वसन झालेल्या एकूण आठ गावातील २२८ लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मूळ गावात जंगलात येत्या सप्टेंबर रोजी जाणार असा इशारा प्रशासनाला दिला होता. मेळघाटच्या जंगलातील नागरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा बु., सोमठाणा खु. केलपाणी या गावातील पुनर्वसन करण्यात आलेल्या गावकऱ्यांनी प्रशासनावर अनेक आरोप करून सध्या राहत असलेले गाव सोडून जंगलातील जुन्या गावात जाऊन राहण्याचा इशारा महसूल वनविभागाला गेल्या काही दिवसांआधी दिला होता. पुनर्वसन करताना प्रकल्पग्रस्तांना वन विभागात नोकरीवर घेण्याबरोबरच इतरही अनेक मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, असा या गावकऱ्यांचा आरोप आहे. 
बातम्या आणखी आहेत...