आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म, अर्थ, काम, मोक्ष संकल्पना योगीश्वराची : दिलीप जोशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- धर्म,अर्थ, काम, मोक्ष ही कल्पना योगीश्वराने सांगितली आहे. ऐहिक सुखासाठी त्यांची सांगड व्यवस्थित बसली पाहिजे, असे प्रतिपादन वाशीम येथील ख्यातनाम वक्ते दिलीप जोशी यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण मंडळाच्या वतीने ‘योगीश्वर महर्षी याज्ञवल्क्य जयंती’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. रामदासपेठेतील पार्थसारथी शुक्ल मंगल कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
व्यासपीठावर कण्व ब्राह्मण मंडळाचे डॉ. सुभाष देशपांडे, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष अमोल पाटील, सचिव विवेक पाटील, गुंजन लांडगे व्यासपीठावर होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, महर्षी याज्ञवल्क्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 
यज्ञेश जोशी आणि सहकाऱ्यांनी मंत्रघोष केला. डॉ. सतीश उटांगळे, विवेक पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. योगेश्वर याज्ञवल्क्य भारतीय तत्वज्ञानाचे जनक होते असे सांगून जोशी म्हणाले, तत्वज्ञानाने जगण्याची शिकवण दिली आहे. भगवान शंकराने सतीला कुठे जावे, कुठे जाऊ नये, काय खावे, काय खाऊ नये याचे दिशादर्शन केले. 
 
महापंगत असली तरी निमंत्रणाशिवाय जाऊ नये, यामागे शास्त्र आहे. तुकोबारायांनी पत्नीला तत्वज्ञान सांगितले. त्यात त्यांनी शरण कोणाला जायचे या बाबत दिशादर्शन केले. परमेश्वराला संकट सांगून पाहा त्यातून मार्ग मिळतो. याज्ञवल्क्यांनी या संदर्भात त्यांची दुसरी पत्नी मैत्रेयी हिला सांगितलेला संवाद जोशी यांनी उपस्थितांना सांगितला. 
 
जोशी यांनी एकत्रित कार्यक्रमातून मनुष्य निर्माणाचे कार्य होत असते. परंतु आयोजनामध्ये मन आणि मस्तीष्काचा विचार झाला पाहिजे, असे जोशी यांनी सांगितले. प्रास्ताविक गुंजन लांडगे यांनी केले. ७८ वर्षांपूर्वी गणेश जयंतीला शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण मंडळाची स्थापना झाली. मंडळाकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कृतिका विजय मोहरीर हिने केले. तर, आभार मंदार कुळकर्णी याने मानले. 
 
हिंदूकोड बिलात याज्ञवल्क्यांचा अभ्यास : घटनाकारडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबिल तयार करताना याज्ञवल्क्यांचा अभ्यास केला आहे. इतकेच नाही तर विधवा विवाह, मुलींना संपत्तीत समान वाटा मिळावा हे सांगणारे याज्ञवल्क्य महर्षि होते. त्यांच्या तत्वज्ञानातून, याज्ञवल्क्य स्मृतीतून कायदे निर्माण झाल्याचे दिलीप जोशी म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...