आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात जिद्दीने धावले हजारो पाय, ‘डिजीटल इंडिया’चा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील वर्षांपासून विविध विषयांची जनजागृती व्हावी, चालण्याचे महत्त्व कळावे, यासाठी शहरात आयएमए वॉकथॉनचे आयोजन केले जात आहे. रविवार, फेब्रुवारी रोजी आयएमए वॉकथॉन मध्ये ‘डिजीटल इंडिया’चा संदेश देत हजारो अकोलेकर धावले. ‘नाही पहावी लागणार आता कामाची वाट, कारण डिजीटल इंडिया घेऊन आलाय आता नवी पहाट’ असा संदेश अकोलेकरांनी शहरातील विविध भागातून धावून दिला. 
 
इंडियन मेडीकल असोसिएशन आणि सिव्हील लाईन येथील अायएमए हॉल पासून आयएमए वॉकॅथॉनला सुरूवात झाली. यंदाचे हे वॉकॅथॉनचे दहावे वर्ष असून, शहिद जवानांना समर्पित करण्यात आले. नुकतेच जम्मु कश्मिर येथे शहिद झालेले आनंद गवई, संजय खंडारे, विकास समुद्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
 
हे वॉकॅथॉन ३, आणि १० किलोमीटर या गटात झाली. स्पर्धेची सुरूवात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त अजय लहाने यांनी हिरवी झेंडी देऊन केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, प्रभजितसिंह बछेर, डॉ. अपर्णा रणजीत पाटील, आयएमएचे अध्यक्ष डॉ. कैलाश मुरारका, सचिव डॉ. जुगल चिराणीया, डॉ. किशोर पाचकोर, डॉ. विनीत हिंगणकर, डॉ. अजय चव्हाण, डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. सत्यम मंत्री, डॉ. संदीप चांडक, डॉ. के. के. अग्रवाल उपस्थित होते.
 
वॉकॅथॉन मध्ये किलोमीटर गटात ते १४ वर्ष वयोगट, किलोमीटर गटात १४ ते १८ वर्ष वयोगट, १८ ते ४५ वर्ष वयोगट ४५ ते ६५ वर्ष वयोगट आहेत. तर १० किलोमिटर गटात १८ते ४५ वर्ष आणि ४५ ते ६५ वर्ष वयोगटातील नागरिक सहभागी झाले. अडीच वर्षांच्या चिमुकलीसह ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत हजारो अकोलेकर यात सहभागी झाले. वसंत देसाई क्रीडांगण येथे वॉकॅथॉनचा समारोप झाला.
 
 या वॉकॅथॉनसाठी एनसीसीच्या १६० कॅडेट्स, पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले. वॉकॅथॉन उद्घाटनादरम्यान आणि समारोप कार्यक्रमात अकोलेकरांना विविध सुरेल गीतांचा नजराणा अनुभवता आला. डॉ. ऋषभ पारिसे आणि कृतिका बोरकर यांनी एका पेक्षा एक सुरेल गीते गाऊन अकोलेकरांची मने जिंकली. 
 
नियमपाळा आणि देश घडवा :देशासाठी काहीतरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी देशाच्या सीमेवर जाऊनच लढण्याची गरज नाही. तर संविधानाने ठरवून दिलेले नियम प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे पाळल्यास देशाचा नक्कीच विकास होऊ शकतो. नियम पाळा आणि देश घडवा, असा संदेश डॉ. हितेंद्र महाजन यांनी दिला.
 
 नाशिक येथील डॉ. हितेंद्र महाजन डॉ. महेंद्र महाजन हे बंधू यावर्षीचे वॉकॅथॉनचे विशेष आकर्षण होते. या महाजन बंधू यांनी अमेरिकेत झालेली ४८०० किलोमीटर सायकल रेस जिंकून नुकतेच भारतात चेन्नई, कलकत्ता, दिल्ली मुंबई असा प्रवास सायकलवर पूर्ण केला आहे. डॉ. हितेंद्र महाजन यांनी अकोलेकरांसोबत संवाद साधत वॉकॅथॉन म्हणजे निरोगी आयुष्याकडे जाणारी पहिली पायरी असल्याने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, आयएमए वॉकथॉन फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...