आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतीयांच्या ‘कारागिरी’ची गाठीला चव, साखर गाठींच्या निर्मितीची परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - होळी अन् धुळवडीसाठी आवश्यक असलेल्या गाठीचे उत्पादन घरगुती कारखान्यांमध्येे वेगाने सुरू आहे. वऱ्हाडातील अनेक गावांमध्ये अकोटमधून गाठीचा पुरवठा केला जातो, अशी माहिती गाठी तयार करणारे व्यावसायिक जगदीश गुप्ता यांनी दिली. 
 
साखरेपासून तयार करण्यात येणारा गाठी हा पदार्थ केवळ होळीच्या सुमारासच बाजारात विक्रीसाठी येतो. या दरम्यानच तो तयार करण्यात येतेा. गाठीचे महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशीदेखील आहे. या वेळीसुद्धा गाठी लागते. साधारणपणे मराठी वर्षाचा शेवट आणि प्रारंभ होताना गाठीचा उपयोग केला जातो. मराठी कालगणनेमधील फाल्गुन चैत्र या महिन्यामध्ये गाठीला मागणी असते. 

गाठीकरण्यासाठी लागणारे मुख्य घटक 
गाठीतयार करण्यासाठी सर्वात जास्त साखर लागते. किंबहून मुख्य घटकच साखर आहे. साखरेसोबतच जाड दोरा, दुध पावडर, टिनोपाॅल, हायड्रोपावडर आदी घटक वापरले जातात. 

परप्रांतीय कारागीर शहरात 
अकाेट येथे गाठ्या तयार करण्यासाठी परप्रांतीय कारागीर दरवर्षी शहरात येतात. लक्ष्मण राजपूत हा उत्तर प्रदेशातील औरय्याचा कारागीर येथे येतो. इतरही ठिकाणी परप्रांतीय कारागीर येतात. त्यांच्यासोबत शहरातील महिला, पुरुष कामगार मदतनीस म्हणून काम करतात. 
या सर्वांच्या सहकाऱ्याने गाठ्या तयार करण्यात येतात. तयार झालेल्या गाठ्यांची परिसरातील विविध गावातील बाजारपेठांमधून विक्री करण्यात येते. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या व्यवसायातून अनेक जणांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे हा व्यवसाय टिकावा,अशी अपेक्षा सर्वतस्तरातून व्यक्त होत आहे. 

मजुरीचा दर 
कारागीराला ४०० रु. प्रति क्विं.मजुरी मिळते. मदतनीस महिलांना २५० रु. प्रति रोज मजुरी मिळते. ठोक बाजारात ६५ रु प्रति कि. किरकोळ बाजारात १०० रु. प्रति किलो असा गाठीचा दर आहे. 

पारंपरिक व्यवसाय टिकवण्याचा प्रयत्न 
^साखर,मजुरी,वाहतुकीचे दर वाढलेत त्या तुलनेत गाठी विक्रीचे दर वाढले नाहीत. तरी देखील आम्ही परंपरागत व्यवसाय टिकावा म्हणून हा व्यवसाय करतो. रोहितगुप्ता, व्यापारी, अकोट.
 
मोठ्या पदकाच्या गाठ्यांना मागणी 
^हिंदी भाषिकांमध्ये मोठ्या रंगीत पदकाच्या गाठ्यांना मागणी असते. या गाठ्यांना चलणी नाणे नोटाही लावल्या जातात. नवीन जावयाला या गाठ्या धुळवडीला भेट देण्यात येतात. जितुगुप्ता, व्यापारी, अकोट 

इथे विकला जातो माल 
^अकोट शहरासह वाशीम, कारंजा, देऊळगाव राजा, अंजनगाव, दर्यापूर, परतवाडा, जळगाव जामोद, तेल्हारा, बाळापूर, आसलगाव, मुंडगाव आदी ठिकाणी गाठीचा माल मोठ्या प्रमाणात विकला जातो. जगदीश गुप्ता,व्यापारी, अकोट 
 
बातम्या आणखी आहेत...