आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांचा राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
 
पहिल्यांदाच यंदा महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने उडी घेतली होती. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातर्फे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी पूर्ण ताकदीनीशी उमेदवारी लढवलीही मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांना पत्र लिहिले पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगत राजीनामा सादर केला भविष्यात पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...