आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडतर्फे नांदुरा येथे रास्ता रोको आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा- बाबासाहेबपुरंदरे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार, १८ ऑगस्ट राेजी राज्य महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. या वेळी कार्यकर्त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राज्य शासनाच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार लवकरच त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या पुस्तकातून चुकीचे लिखाण केले आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज वाघ यांनी या वेळी केला. शासनाने त्यांना पुरस्कार जाहीर करून जनभावनेचा अवमान केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारचे धोरण मनुवादी असल्याचा आरोप करत या धोरणाचा त्यांनी निषेध केला. हा पुरस्कार रद्द केल्यास शासनाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शरद पाटील, गणेश धामोडकर, प्रवीण मानकर, अमर पाटील, सचिन गणगे आदींनी सहभाग घेतला.