आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगातील शिक्षकाचे नाव हाेते मस्टरवर; चौकशीनंतर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भाेगत असलेल्या शिक्षकाचे नाव मस्टरवर हाेते, असा प्रकार बुधवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत समाेर अाला. भािरप-बमसंचे सदस्य गाेपाल काेल्हे यांनी यावर प्रकाशझाेत टाकला. या शिक्षकाला मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने निर्देाषमुक्त केल्यानंतर त्याने रूजू हाेण्यासाठी जि.प.ला पत्र दिले अाहे. मात्र, अाता प्रथम शिक्षकाला निलंबित करावे लागणार असून, त्यांची विभागीय चाैकशी करुन नंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
पणज येथील जि.प. उर्दू शाळेतील सहाय्यक अध्यापक मसूद अली सादिक अली यांना एका घरगुती प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली हाेती. ते २३ डिसेंबर २०१२ ते एप्रिल २०१७ या कालवधीत तुरुंगात हाेते. त्यांची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २७ मार्च २०१७ राेजी निर्देाषमुक्तता केली. त्यामुळे त्यांनी अकाेट पंचायत समिती नंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे रूजू हाेण्यासाठी अर्ज केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. मात्र तरीही त्यांना रूजू करुन घेण्यात अाले नाही. त्यामुळे बुधवारी गाेपाल काेल्हे यांनी सभेत मुद्या उपस्थित केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. 

पाणीपुरवठा याेजना हस्तांतरणाचा ठराव नामंजूर : अकाेट ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना जि.प.कडे हस्तांतरण करण्याचा ठराव नामंजूर करण्यात अाला. ज्येष्ठ सदस्य विजय लव्हाळे, दामाेदर जगताप गाेपाल काेल्हे यांनी दुरुस्ती, त्रृटी दूर झाल्याशिवाय हस्तांतरण करु नये, असे सांगितले. सध्या पाणी पुरवठा जलकुंभातून हाेताे काय, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. यावर अभियंते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. 

शेगावयेथील जमिनीचा मुद्या थंडबस्त्यात : शेगावयेथे जिल्हा परिषदच्या मालकिची एकर तीन गुंठे जमीन असून, ही जमीन बिल्डरांकडून हडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सदस्य नितीन देशमुख म्हणाले. याबाबत त्यांनी मागील सभेत मुद्याही उपस्थित केला हाेता. त्यामुळे अभियंत्यांनी माहिती सादर करावी, असेही ते म्हणाले. यावर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी त्या ठिकाणी सुरु असलेले बांधकाम जि.प.च्या जमिनीवर सुरु अाहे कि नाही, हे स्पष्ट झाले नाही, असे सांगितले.तसेच याबाबत माेजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाला पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावर देशमुख महादेव गवळे यांनी ते बिल्डर काेण अाहेत, तुम्ही केलेल्या पाहणीत काय अाढळले, असे प्रश्न केले. यावर अध्यक्षांनी दाेन दिवसात मािहती घेऊन सांगा, असा अादेश अभियंत्यांना दिला. 

लक्षांक्षपेक्षा जादा विहिर मंजूर : बाळापूरतालुक्यातील मंजूर झालेल्या विविरींचे अनुदान मिळाले नसल्याचा मुद्या विजय लव्हाळे, हिंम्मतराव घाेटाेळ यांनी उपस्थित केला. अधिकारी निधी नसल्याचे सांगत असून, लक्षांक्षपेक्षा जादा विहिर मंजूर का करण्यात अाल्या, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. 

अावास याेजनेची हाेणार चाैकशी : येवता येथे पंतप्रधान रमाई अावास याेजनेत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्या सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी उपस्थित केला. प्रतिक्षा यादीमध्ये घाेळ करण्यात अाला अाहे. प्राधान्यक्रम डावलून प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना देवाण-घेवाण करुन लाभ देण्यात अाला, असा अाराेप पांडे यांनी केला. यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी चाैकशी करण्यात येईल, असे सांगितले. 

‘त्या’ शिक्षकांना रूजू करून घेऊ नका 
अांतरजिल्हा शिक्षक बदलीप्रक्रियेवर सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही बदल्या न्यायालयाच्या अादेशाने तर काही विभागीय अायुक्तांच्या अादेशाने करण्यात अाल्या अाहेत. मात्र, या बदल्यांसाठी जि. प.ने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास त्याची चाैकशी व्हावी अािण त्या शिक्षकांना रूजू करुन घेऊ नये, असे पांडे म्हणाले. 

अतिक्रमण हटणार 
कासली येथील गुठ्ठे जागा एका शेतकऱ्याने जि.प.ला तलावासाठी दिली असून, या जागेवर काहींनी अतिक्रमण केले असून, ते शेती करीत असल्याचे सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी सभागृहात सांगितले. यावर लघुसिंचन विभागाच्या अभियंत्यांनी तलाव दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच संपूर्ण जागा ताब्यात घेऊन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात हाेईल, असे सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...