आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेट टॉप बॉक्स’ला 30 मार्चपर्यंत मुदतवाढ, शहरी क्षेत्र शंभर टक्के आले आवाक्यामध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दूरचित्रवाणीवरील विविध कार्यक्रम, मालीका, बातम्या आदींचे प्रसारण पाहण्या-ऐकण्यासाठी आवश्यक असलेले सेट टॉप बॉक्स आता आगामी ३० मार्चपर्यंत बसवता येणार आहेत. पूर्वी ही मुदत २० डिसेंबरपर्यंतच होती. परंतु, दरम्यानच्या काळात आलेल्या निवडणुका त्यामुळे यंत्रणेवर आलेला ताण लक्षात घेता शासनाने ही मुदत तीन महिन्यांसाठी वाढवून दिली आहे. शहरी क्षेत्र पुर्णत: आवाक्यात आल्यामुळे ही मुदतवाढ केवळ ग्रामीण भागासाठी असेल. 
दरम्यान नियोजित वेळांत सेट टॉप बॉक्स बसवल्यास ग्रामीण भागाचे प्रसारण बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या वर्षभरापासून या िवषयाची अंमलबजावणी सुरु अाहे. त्यानुसार सहा महिन्यापूर्वी संयुक्तपणे पहिला दुसरा टप्पा राबविण्यात आला. त्याचवेळी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचा कालावधीही आखून देण्यात आला होता. यातील चौथ्या टप्प्याचा कालावधी शहरी भागासाठी २३ नोव्हेेंबर तर ग्रामीण भागासाठी २० िडसेंबर ठरविण्यात आला होता. या काळात शहरातील नागरिकांनी सेट टॉप बॉक्स बसविले. परंतु ग्रामीण भागातील अजूनही काही कुटुंबांमध्ये या यंत्राचा प्रवेश झाला नाही. त्यासाठी आता ३० मार्च ही तारिख आखून देण्यात आली आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास शहरातील सर्व िटव्हीधारकांनी म्हणजेच २० हजार ९४४ कुटुंबांनी सेट टॉप बॉक्स बसविले असून ग्रामीण क्षेत्रात बसविण्याच्या चौथ्या टप्प्याचे उद्दीष्ट ११ हजार ३३६ ठरवले आहे. या सर्वांना पुरवता येईल एवढे बॉक्स प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी लवकर ती सेवा स्वीकारुन प्रसारण पूर्ववत करावे, असे आवाहन केलेे. 
 
‘डीटूएच’द्वारे डीजीटायझेशन 
वेगवेगळ्या वाहिनींचे कार्यक्रम पाहण्या-ऐकण्यासाठी सध्या केबल ऑपरेटरच्या माध्यमातून सेवा घेतली जाते. त्याऐवजी ‘डीजीटायझेशन’ करुन प्रत्येकाला हवे ते स्वातंत्र्य देण्यासाठीचा हा प्रयोग आहे. त्यासाठी ‘डी टू एच’ प्रणाली अंमलात आणली जात आहे. या प्रणाली अंतर्गत टाटा स्काय, व्हिडीओकॉन, रिलायंस, सन टिव्ही, एअरटेल आणि डीडीचे सेट टॉप बॉक्स उपलब्ध आहेत. या सेट टॉप बॉक्सला मोबाईलप्रमाणे ‘प्री-पेड’ करावे लागणार आहे. त्यामुळे केबल ऑपरेटरचा अडथळा दूर होईल आणि कर वसुलीसाठीचा यंत्रणेवर असलेला ताणही दूर होईल. 
 
३१ जानेवारीपर्यंत पूर्ण झाले शहरी टार्गेट 
सेट टॉप बॉक्स बसविण्याची जबाबदारी प्रशासनाने स्थानिक केबल ऑपरेटरच्या खांद्यावर टाकली होती. दरम्यान शासनाने वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढीमुळे ३१ जानेवारी २०१७ पर्यंत सर्वांच्या (अर्थात टीव्ही संच वापरणाऱ्यांच्या) घरात सेट टॉप बॉक्स बसवण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...