आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने लावले पक्ष प्रमुखांना धन्यवाद देणारे फलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - कर्जमुक्तीच्या घाेषणेनंतर अाता भाजप- शिवसेनेमध्ये श्रेयवादाचे राजकारण तापले अाहे. कर्जमुक्तीवरुन मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देणारे भाजपने लावलेले फ्लेक्स शिवसेनेने फाडल्यानंतर अाता सेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देणारे फलक लावले अाहेत. शिवसेनेने नाक दाबलं म्हणून सरकारचे कर्जमुक्ती जाहीर करण्यास ताेंड उघडलं, अशा शब्दात सेनेने भाजपवर हल्लाबाेल केला अाहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप-िशवसेनेतील दरी अाणखी वाढणार अाहे, असे राजकीय जाणकारांचे मत अाहे. 
 
शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेना केंद्र, राज्य सरकारला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडत नाही. दाेन्ही पक्षात जिल्हयात कुरघाेडीचे राजकारण नेहमीच चालते. शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने मे महिन्यात बाळापूर येथे रुमणे अांदाेलन केले हाेते. त्यानंतर शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा देत टायर जाळून रास्ता राेकाे अांदाेलन केले हाेते. शेतकऱ्यांचे अांदाेलन राज्यभर पेटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ अाॅक्टाेबरपर्यंत कर्जमुक्ती करण्याची ग्वाही दिली हाेती. मात्र गत अाठवड्यात भाजपने अचानक कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देणारे फलक लावल्याने शिवसेना नेते संतप्त झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसैनिकांनी हे फलक फाडून टाकले हाेते. 

भाजपचा घेतला समाचार :मी कर्जमुक्त हाेणारच, या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घाेषणेचा उल्लेख शिवसेनेने लावलेल्या फलकावर केला अाहे. शिवसेनेने नाक दाबलं म्हणून कर्जमुक्ती जाहीर करण्यास ताेंड उघडं. अापण ते बाेलले तर अापण करुन दाखवलं, शिवसेनाच खरी ठरली, असेही फलकावर नमूद केले अाहे. या फलकावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, अादित्य ठाकरे संपर्क प्रमुख खासदार सावंत यांचे फाेटाे अाहेत. शिवसेनेही गटबाजी असल्याने फलकावर स्थानिक नेत्याचा फाेटाे नाही. 

भाजप फलकावर काय? 
कर्जमुक्तीबाबत भाजपने माेठे फलक लावले हाेते. यावर ‘बळीराजा कर्जमुक्तीची एेतिहासिक भेट दिल्याबद्दल धन्यवाद मुख्यमत्री’ ! असे लिहिले हाेते. तसेच फलाकवर ‘शेतकाऱ्याचे सरकार, देवेंद्र सरकार,’ अशा घाेषवाक्याचाही उल्लेख हाेता. त्यामुळे राज्यात भाजप-िशवसेना युती सरकार असतानाही फलकावर केवळ ‘देवेंद्र सरकार’ असा उल्लेख असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या हाेत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...