आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील १३ लघू प्रकल्प अाता कोरडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील ३२ लघू प्रकल्पांपैकी १३ लघू प्रकल्प मे महिन्याच्या प्रारंभीच कोरडे पडले आहेत, तर १० लघू प्रकल्पात अत्यल्प जलसाठा उरला आहे. तसेच सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात २८.४६ तर उमा प्रकल्पात ९.४२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. 
जिल्ह्यातील दोन मोठ्या, तीन मध्यम तर ३२ लघू प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना तसेच सिंचनासाठी पाणी दिले जाते. या प्रकल्पामुळे विविध गावातील भुजलाच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळते. त्यामुळेच या प्रकल्पांची जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वाची भूमिका असते. 

प्रकल्प शंभर टक्के भरल्यास मोठ्या प्रमाणात जमिन सिंचनाखाली येते. अन्यथा प्रकल्पातील पाणी पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित केले जाते. मागील वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने तुरळक प्रकल्प वगळता इतर प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यावेळी तुलनेने जिल्ह्यात पाणी टंचाई फारशी जाणवली नाही. 

परंतु, आता तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने पाण्याची मागणी वाढली असून, बाष्पीभवनातही वाढ झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील लघू प्रकल्प कोरडे पडण्यास सुरुवात झाली असून, मध्यम प्रकल्पातही अत्यल्प जलसाठा राहिला आहे. 

१३ लघू प्रकल्प कोरडे 
अकोट तालुक्यातील भिलखेड, मूर्तिजापूर तालुक्यातील पिंपळशेंडा, बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे, जनुना, घोटा, घोंगा, मोऱ्हळ, हातोला, पातूर तालुक्यातील गावंडगाव, सावरगाव बांध, विश्वामित्री, सुकळी, बाळापूर तालुक्यातील कसुरा, तामसी हे लघू प्रकल्प कोरडे पडले असून, दहा लघू प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे. 

जलसाठा असा 
काटेपूर्ण २४.५७ दलघमी 
वान ४७.१६ दलघमी 
मोर्णा ७.७४ दलघमी 
निर्गुणा ६.३१ दलघमी 
उमा १.१० दलघमी 
 
बातम्या आणखी आहेत...