आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलीसाठी बांधलेल्या २९ गोऱ्ह्यांची सुटका, रामदासपेठ पोलिस हद्दीत सर्वाधिक कारवाया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन बैदपुरा येथून गोऱ्ह्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीविरुद्ध कारवाई केली आहे. - Divya Marathi
नवीन बैदपुरा येथून गोऱ्ह्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीविरुद्ध कारवाई केली आहे.
अकोला- गोवंशहत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर राज्यात अवैधपणे गोवंशाच्या कत्तली लपूनछपून सुरूच आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी शोधमोहीम राबवली. या वेळी रामदासपेठेतील नवीन बैदपुरा येथे २९ गोऱ्हे निर्दयतेने कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे दिसून आले. या सर्व गोऱ्ह्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीविरुद्ध कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. पोटभरे यांच्या पथकाला नवीन बैदपुरा येथून गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून त्यांनी त्यांच्या पथकासह रामदासपेठेत शोधमोहीम राबवली. यादरम्यान त्यांना सकाळी १०.१५ वाजता नवीन बैदपुरा येथे २९ गोऱ्हे निर्दयपणे बांधण्यात आलेले दिसून आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता कत्तलीसाठी राखून ठेवल्याचे दिसून आले. या गोऱ्ह्यांची किंमत तीन लाख ६३ हजार रुपये आहे. पोलिसांनी या गोऱ्ह्यांना ताब्यात घेतले असून, गोरक्षणमध्ये पाठवले आहे. या गोऱ्ह्यांचा मालक म्हणून पोलिसांनी खैर मोहम्मद प्लॉट येथील शेख हबीब शेख हुसेन (वय ४५) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध प्राणी रक्षण कायदा आणि प्राण्यांना निर्दयतेने वागणूक या कायद्यान्वये रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

इतरपोलिस ठाण्यांतर्गत एकही कारवाई नाही : रामदासपेठपोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरवड्यात अनेक गोवंशाची सुटका करण्यात आली. या कारवाया रामदासपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष माकोडे यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान केली. मात्र, शहरातील इतर पोलिस ठाण्यांतर्गत एकही कारवाई नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

एलसीबीची कारवाई
स्थानिकगुन्हे शाखेेने गोवंश पकडल्याची गेल्या वर्षातील सर्वांत मोठी कारवाई आहे. यापूर्वी त्यांनी गेल्या महिन्यात कत्तलीसाठी नेण्यात येणारे गोवंश जुन्या शहरातून ताब्यात घेतले होते. मात्र, गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईमुळे गोवंशाची कत्तल करणाऱ्यांनी धसका घेतला आहे.