आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मूर्तिजापुरात स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- कृषी फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मूर्तिजापूरनगरित प्रथम आगमन प्रसंगी आ. हरिष पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालय लकडगंज येथे आतषबाजीच्या गजरात सत्कार, बळीराज्याचा सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत केले. तसेच सदाभाऊ खोत यांच्या हस्ते तीन गरजू अपंगांना तिनचाकी सायकल वाटप करण्यात आले. 
 
विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून प्रथमच राज्यमंत्री खोत यांचे मूर्तिजापूरात आगमन झाले होते. यावेळी आ. हरिष पिंपळे, नगराध्यक्षा मोनालीताई कमलाकर गावंडे, तालुकाध्यक्ष नारायणराव भटकर, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष अविनाश पाटील महल्ले, शहराध्यक्ष भारत भगत, पं. स. सभापती भावनाताई राजू सदार, सतिशचंद्र शर्मा, विनायक वारे, डाॅ.पाथरकर, चंद्रकांत तिवारी, रावसाहेब कांबे,पुरुषोत्तम डागा,राजकुमार नाचणे, दिग्वीजय गाडेकर, राहुल नागपूरे, निलेश मानके, संदीप जळमकर, संतोष कपिले, डाॅ मुलमुले ताई, सौ.गोसावी ताई, हजारे ताई, राजेंद्र हांडे, छत्रपती साबळे,गणेश महल्ले, राम पाटील, हर्षल साबळे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 
 
शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा आढावा तसेच मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेती क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 
भाजपपदाधिकारी कडून कर्ज माफीसाठी निवेदन 
राज्यात कर्जमाफीचा मुद्दा गाजत असताना मुर्तिजापूर भाजपचे तालुका अध्यक्ष नारायणराव भटकर,छत्रपती साबळे आदींसह राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना निवेदन देऊन ग्रामीण भागातील समस्या,कर्ज माफी, शेतीसाठी कुंपण यांची मागणी केली. 
बातम्या आणखी आहेत...