आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरुग्णाकडून चिखली येथे पुतळ्याची विटंबना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शनिवारी दुपारी एका मनोरुग्णाने दगड मारून विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती शहरात पसरताच सर्व शिवप्रेमी जनता रस्त्यावर उतरली. व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करून या घटनेचा निषेध नोंदवला. या घटनेच्या निषेधार्थ १८ सप्टेंबर रोजी शहर बंदचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी गजानन सोनाजी इंगळे वय ३० रा. उत्रादा या मनोरुग्णास अटक केली.
 
आज दुपारी बगडिया मंगल कार्यालयाकडून एक ३० वर्ष वयाचा मनोरुग्ण युवक पुतळ्याजवळ आला. त्याने संरक्षक कठडे चढून पुतळ्याला दगड मारून पळ काढला. ही घटना बालाजी अर्बन पतसंस्थेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेची माहिती पसरताच तणाव निर्माण झाला. त्यानंतर शिवप्रेमींनी घटनेच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढला. त्यानंतर माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, पालिकेचे विरोधी पक्षनेते रफिक कुरेशी, जनशक्तीचे प्रशांत ढोरे आदींनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.
बातम्या आणखी आहेत...