आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोणगाव: पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण करण्याचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
डोणगाव - शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही राष्ट्रीय पेयजल योजना अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे सदर योजनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधिताकडून शासकीय रकमेची वसुली करण्यात यावी, अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद््वारे दिला आहे. 
 
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले की, मागील तीन वर्षांपासून राज्य शासनाच्या वतीने कोटी रुपये खर्च करुनही डोणगाव येथील ही राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण करण्यात आलेली नाही. या संदर्भात डोणगावच्या नागरिकांनी शासनाकडे या संदर्भात वारंवार मागणी केली, आंदोलनेही केली. परंतु संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पंचातय समितीचे गटविकास अधिकारी सानप पाणीपुरवठा विभागाचे राजपूत यांनी २१ दिवसांत सदर योजना पूर्ण करण्याचे आश्वासन २५ एप्रिल २०१६ रोजी दिले होते. परंतु दिलेले हे आश्वासन देवून एक वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असताना देखील सदर राष्ट्रीय पेयजल योजना पूर्णत्वास आलेली नाही. 
 
त्यामुळे या राष्ट्रीय पेयजल योजनेत संबंधितांकडून झालेल्या अपहाराची तात्काळ चौकशी करून हा अपहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण करण्यात येईल, असा इशाराही स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. त्यावर शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम करण्यात आले आहे. परंतु सदर राष्ट्रीय पेयजल योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी वाढीव निधीची आवश्यकता आहे. त्या संदर्भातील प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे हा वाढीव निधी येताच योजनेचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी पंजाबराव मोरे यांनी दिली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...