आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावई, नातवांनी धरले अन् मुलीने जन्मदात्रीला पाजले विष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ज्या मुलीला दुध पाजले, त्याच मुलीने आपल्या ७० वर्षीय आईच्या तोंडात विष ओतले. मनाला सुन्न करणारी ही घटना बुधवारी उघडकीस आली. पोलिसांनी जावयाला त्याच्या मुलांना अटक केली. तर मुलगी मात्र फरार होण्यात यशस्वी झाली.
आईला विष पाजून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार डाबकी रोड परिसरातील शांती नगरमध्ये घडली. अन्नपूर्णा विश्राम खंडारे रा. माझोड असे या अभागी मातेचे नाव आहे. अन्नपूर्णा खंडारे यांच्याकडे माझोड शेतशिवारात तीन एकर शेती आहे. मात्र ही शेती नावाने करून देण्यासाठी अनेक दिवसांपासून अन्नपूर्णा खंडारे त्यांची मुलगी रत्नमाला खंडारे या मायलेकीत वाद होते. मंगळवारी संध्याकाळी पाच-सहा वाजताच्या दरम्यान अन्नपूर्णा खंडारे या मुलगी रत्नमाला यांच्या घरी भेटीसाठी गेल्या होत्या. येथे त्याच्यात शेती नावाने करून देण्यावरून वाद झाला. यावेळी आईचा कायमचाच काटा काढण्याच्या उद्देशाने त्यांनी अन्नपूर्णा खंडारे यांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न कट रचला. जावई समाधान फकिरा वानखडे नातू सुरेश समाधान वानखडे, उमेश समाधान वानखडे यांनी अन्नपूर्णा खंडारे यांचे हात-पाय पकडले आणि मुलगी रत्नमाला हीने आईच्याच तोंडात विषाची बाटली कोंबली. पोटात विष गेल्याने आईची शुद्ध हरपली. आता अन्नपूर्णा खंडारे यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अन्नपूर्णा खंडारे यांचा मुलगा सिद्धार्थ विश्राम खंडारे यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी मुलगी रत्नमाला समाधान वानखडे, जावई समाधान फकीरा वानखडे, उमेश समाधान वानखडे सुरेश समाधान वानखडे यांच्यावर भादंवी ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रत्नमाला फरार असून समाधान वानखडे त्याचा मुलगा सुरेश उमेश यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या वतीने अॅड. वैशाली गिरी भारती अॅड. केशव एच. गिरी यांनी काम पाहिले. तर या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.पी. खंडारे करीत आहेत.

तीन एकर शेतीने केला घात
तीन एकर शेती नावाने करून घेण्याच्या लालचेपोटी आता मुलीच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. भाऊ बहिणी असतानाही एकटीच्याच नावाने शेती करण्याचा मोह रत्नमाला हीला झाला आणि आईलाच संपवून शेती हडपण्याच्या तिच्या मनसुब्यावर पाणी फिरले.
बातम्या आणखी आहेत...